GT vs MI, Eliminator Match Key Players: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, 'हे' खेळाडू करु शकतात कहर
हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला. या हंगामात, गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे.
Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator, IPL 2025 Match: टाटा आयपीएल 2025 मध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना मुल्लानपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला. या हंगामात, गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हेड टू हेड रेकॉर्ड (GT vs MI Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण सात सामने खेळले गेले आहेत. या काळात गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने पाच सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. दोन्ही वेळा गुजरात टायटन्सने सामना जिंकला. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना गुजरात टायटन्सने सहा धावांनी जिंकला होता. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात.
'या' दिग्गज खेळाडूंवर असेल सर्वाच्या नजरा
शुभमन गिल: गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शुभमन गिलने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान शुभमन गिलने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शुभमन गिलची आक्रमक फलंदाजी एसआरएचसाठी गेम चेंजर ठरू शकते.
साई सुदर्शन: गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज साई सुदर्शनने 349 धावा केल्या आहेत. यादरम्यान साई सुदर्शनने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर साई सुदर्शनने शांतता राखली तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो.
रशीद खान: गुजरात टायटन्सचा घातक गोलंदाज रशीद खानने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 4 बळी घेतले आहेत. यादरम्यान, रशीद खानने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये रशीद खानची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.
रोहित शर्मा: रोहित शर्माने आतापर्यंत सीएसकेविरुद्ध 34 सामन्यात एकूण 896 धावा केल्या आहेत. रोहित शर्माला 1000 चा आकडा गाठण्यासाठी फक्त 104 धावांची आवश्यकता आहे. जर रोहित शर्मा मैदानावर राहिला तर तो एकाच सामन्यात हा आकडा गाठू शकतो.
सूर्यकुमार यादव: मुंबई इंडियन्सचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या 10 डावात 381 धावा केल्या आहेत. यादरम्यान, सूर्यकुमार यादवने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचे उत्तम टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवू शकतात.
ट्रेंट बोल्ट: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने गेल्या नऊ सामन्यात 13 बळी घेतले आहेत. ट्रेंट बोल्टची अचूक गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

