GT vs KKR 63th Match IPL 2024 Live Streaming: गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमने सामने, पहा थेट प्रक्षेपण कुठे आणि कसे पहाल

आयपीएल 2024 गुणतालिकेत कोलकाता 12 सामन्यांत नऊ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. 12 सामन्यांत 5 विजयांसह गुजरात आठव्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ची कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) गाठ पडणार आहे. गुजरात आणि कोलकाता हे दोन्ही संघ या सामन्यात विजयासह प्रवेश करतील. गुजरातने आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 35 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. दुसरीकडे, सलग चार सामने जिंकून केकेआर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ( IPL 2024 Points Table Update 2024: दिल्लीचा पराभव करून बंगळुरू पाचव्या स्थानावर, सीएसकेलाही झाला मोठा फायदा; इतर संघांची जाणून घ्या स्थिती)

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ अद्यापही प्लेऑफच्या प्रवेशासाठी आशावादी आहे. पण आयपीएल 2024 प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना बरेच काही करावे लागेल. KKR आधीच IPL 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएल 2024 गुणतालिकेत कोलकाता 12 सामन्यांत नऊ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. 12 सामन्यांत 5 विजयांसह गुजरात आठव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे.

पाहा पोस्ट -

IPL 2024 चा GT vs KKR सामना कधी खेळला जाईल?

GT vs KKR IPL 2024 सामना 13 मे (सोमवार) रोजी होणार आहे.

IPL 2024 चा GT vs KKR सामना कुठे खेळला जाईल?

जीटी विरुद्ध केकेआर आयपीएल 2024 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

IPL 2024 चा GT vs KKR सामना किती वाजता सुरू होईल?

GT vs KKR IPL 2024 सामना IST संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल.

चाहते IPL 2024 GT vs KKR मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकतात?

GT vs KKR IPL 2024 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारतात चाहत्यांना IPL 2024 GT vs KKR सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल?

GT vs KKR IPL 2024 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल.

IPL 2024 च्या GT vs KKR सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 काय आहेत?

गुजरात टायटन्स (GT) संभाव्य प्लेइंग 11: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संभाव्य प्लेइंग 11: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.