Glenn Maxwellची गर्लफ्रेंड विनी रमणला यूजरने केलं ट्रोल, Trollerला सडेतोड उत्तर देत शिकवला चांगला धडा, पाहा तिची इंस्टाग्राम पोस्ट

यूजरच्या अशा प्रतिक्रियेवर विनी दुर्लक्ष केले नाही आणि त्याला सडेतोड उत्तर देत चांगला धडा शिकवला. 

ग्लेन मॅक्सवेल विनी रमनसह (Photo Credits: Instagram)

आजच्या सोशल मीडियाच्या काळात चित्रपट ताऱ्यांपासून खेळाडूंपर्यंत अनेकांवर चाहत्यांचे लक्ष असते. त्यांच्या व्यावसायिक जीवनापासून त्यांच्या खासगी आयुष्यात काय चालते हे सर्व जाणून घेण्यामध्ये यूजर्सना बराच रस असतो. या दरम्यान खेळाडूंच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नींना ट्रोल देखील करण्यात येते. असाच एक प्रसंग ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) गर्लफ्रेंड विनी रमणसोबत (Vini Raman) घडला. भारतीय वंशाच्या विनीने सोशल मीडियावर तिचा आणि मॅक्सवेलचा फोटो शेअर केला ज्याच्यावर एका यूजरने 'व्हाईट' खेळाडूला सोडून एका भारतीयासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. यूजरच्या अशा प्रतिक्रियेवर विनी दुर्लक्ष केले नाही आणि त्याला सडेतोड उत्तर देत चांगला धडा शिकवला. आयपीएलमुळे (IPL) अनेक खेळाडू आपल्या घरच्यांपासून दूर युएईमध्ये आहेत, अशा स्थितीत त्यांना आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीची आठवण येत आहे. (Sunil Gavaskar-Anushka Sharma Controversy: विराट कोहली-अनुष्का शर्माबाबतच्या वादग्रस्त विधानावर सुनील गावस्कर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले)

“लॉकडाऊनमध्ये दुसरे शनिवार व रविवार घालवते परंतु मी युएईमध्ये असती अशी इच्छा आहे. 4 आठवडे झाले ? अजून किती,” विनीने मॅक्सवेलसोबत सुंदर फोटो शेअर करत लिहिले. विनी मेलबर्नमध्ये स्थित भारतीय फार्मासिस्ट आहे. विनीने यूजरला देताना म्हटले की, "मी सहसा या गोष्टींची उत्तर देत नाही कारण मला माहिती आहे की ट्रोलर्स फक्त लक्ष वेधण्यासाठी असं करतात, परंतु 6 महिन्यांच्या लॉकडाऊनने मला अज्ञानी लोकांना शिक्षित करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. एका श्वेत व्यक्तीवर प्रेम करणे याचा अर्थ असा नाही की मला भारतीय होण्याची लाज वाटते. एखाद्या श्वेत व्यक्तीवर प्रेम करणे ही माझी निवड आहे आणि इतरांच्या विचारांची मला चिंता करत नाही." पाहा विनी रमणची पोस्ट:

 

View this post on Instagram

 

Spending another weekend in lockdown but wishing I was in the UAE. 4 weeks down, ? to go 💕#whysoserious #fomo @gmaxi_32 @kxipofficial 🏏🦁

A post shared by VINI (@vini.raman) on

विनी रमणने ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर

(Photo Credit: Instagram)

दरम्यान, विनीचे हे धाडसी उत्तर पाहून मॅक्सवेल देखील स्वतःला तिचे कौतुक केल्यापासून रोखू शकला नाही. दुसरीकडे, विनी आणि मॅक्सवेलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यूजर्सनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. दुसरीकडे, मॅक्सवेल सध्या आयपीएलसाठी युएईमध्ये आहे आणि तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे.