SA vs AUS 2020: दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-20 संघात पुनरागमन, पाहा पूर्ण टीम

स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे दोन्ही संघात पुनरागमन झाले आहे, तर बिग बॅशमध्ये चमकदार खेळी करणाऱ्या मार्कस स्टोइनिस ला जागा मिळाली नाही.

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौर्‍यावर जाणारा ऑस्ट्रेलियाचा (Australia) वनडे आणि टी -20 संघ जाहीर करण्यात आला आहे. स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याचे दोन्ही संघात पुनरागमन झाले आहे, तर बिग बॅशमध्ये चमकदार खेळी करणाऱ्या मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) ला जागा मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया 21 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा करतील. ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेत 3 टी -20 आणि तितक्याच वनडे मालिका खेळायच्या आहेत. मानसिक आरोग्याच्या कारणास्तव गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरूद्ध टी-20 मालिकेदरम्यान मॅक्सवेलने खेळापासून ब्रेक घेतला होता. यानंतर, त्याने स्वत:ला यावर्षी जानेवारीत भारत दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते.  पण मॅक्सवेलला भारत दौर्‍यासाठी 14 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले नाही आणि त्याच्याऐवजी मार्नस लाबूशेन याला स्थान देण्यात आले होते.

जानेवारीत भारत दौर्‍यावर आलेल्या संघातून एश्टन टर्नर, डार्सी शॉर्ट आणि पीटर हँड्सकॉम्ब यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागीमॅक्सवेलची मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांची निवड करण्यात आली आहे. बिग बॅश लीगमध्ये वेड आणि मार्शने उत्तम प्रदर्शन केल्याने त्यांना संघात स्थान मिळाले. मात्र, बिग बॅश लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही स्टोइनिसला दोन्ही संघात स्थान मिळाले नाही. ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 मालिकेसह दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍याची सुरूवात करेल. पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे, दुसरा सामना 23 फेब्रुवारी रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे आणि तिसरा सामना केप टाउनमध्ये 26 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

ऑस्ट्रेलिया टी-20 टीम: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कैरी, पॅट कमिन्स, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झए रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ: आरोन फिंच (कॅप्टन), एश्टन एगर, एलेक्स कैरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मैथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif