Australia Preliminary Squad: ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा यांना इंग्लंड दौर्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या 26 प्राथमिक टीममध्ये स्थान, युवा खेळाडूंनाही संधी
ऑस्ट्रेलियाने आगामी इंग्लंडच्या अस्थायी दौऱ्यासाठी 26 खेळाडूंचा प्राथमिक संघ जाहीर केला आहे. उस्मान ख्वाजा, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड या उल्लेखनीय खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया सप्टेंबरमध्ये वनडे आणि टी-20 मालिकेत इंग्लंडचा सामना करेल. या दौऱ्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगारूंचे पुनरागमन होईल.
इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकता ऑस्ट्रेलिया (Australia) आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाने आगामी इंग्लंडच्या (England) अस्थायी दौऱ्यासाठी 26 खेळाडूंचा प्राथमिक संघ जाहीर केला आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नसले तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) मात्र आपली तयारी सुरु केली आहे. उस्मान ख्वाजा, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड या उल्लेखनीय खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया सप्टेंबरमध्ये वनडे आणि टी-20 मालिकेत इंग्लंडचा सामना करेल. या दौऱ्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगारूंचे पुनरागमन होईल. अंतिम संघ जाहीर होण्याची वेळ अजून आली असली तरी 26 खेळाडूंच्या गटात ख्वाजा, हेड, मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस तसेच अॅन्ड्र्यू टाय यांचा समावेश आहे. (Pakistan Tour of England: फाईव्ह-स्टार हॉटेल नाही इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर आर्थिक संकटामुळे लॉजवर राहण्याची वेळ, तुम्हीच पाहा)
गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) तीन अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 26 खेळाडूंची निवड केली असून ते लवकरच सरावाला सुरुवात करतील. या खेळाडूंपैकी 15 सदस्यीय संघाचीइंग्लंड दौर्यासाठी निवड केली जाईल. या 26 खेळाडूंच्या संघात पीटर हँड्सकॉम्ब, नॅथन कुल्टर-नाईल आणि शॉन मार्श यांना मात्र स्थान मिळालेले नाही. कांगारू क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षणासाठी निवडलेल्या या खेळाडूंमध्ये डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ आणि जोश फिलीपी यांचा समावेश आहे. इंग्लंड दौरा निश्चित झाल्यास मालिका बायो-सिक्युर वातावरणात खेळली जाईल असेऑस्ट्रेलियन संघाच्या निवडकर्त्याचा विश्वास आहे. पूर्वी जुलैमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय वनडे आणि टी-20 मालिका आता सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
JUST IN: Australia have named a huge 26-man group with an eye on a UK tour.
DETAILS: https://t.co/xNpOVT732I pic.twitter.com/umGMvbavbT
— cricket.com.au (@cricketcomau) July 16, 2020
ऑस्ट्रेलिया प्राथमिक पथक:
सीन एबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, आरोन फिंच, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, नॅथन लियोन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडर्मोट, रिले मेरीडिथ, मायकेल नेसर, जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, डार्सी शॉर्ट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.
(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2020 02:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

