GG W vs RCB W, 1st Match Live Toss Update: आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
महिला प्रीमियर लीगचा महाकुंभ आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे.
Gujarat Giants Women vs Royal Challengers Bengaluru Women, WPL 2025 1st Match Live Toss Update: महिला प्रीमियर लीगचा (Women's Premier League) महाकुंभ आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील पहिला सामना यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदऱ्यातील (Vadodara) कोटाम्बी स्टेडियमवर (Kotambi Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. यावेळी गुजरात जायंट्सचे नेतृत्व अॅशले गार्डनर (Ashleigh Gardner) करत आहे. तर, आरसीबीची कमान स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) खांद्यावर आहे. यावेळी WPL चार शहरांमध्ये आयोजित केले जात आहे.
यामध्ये वडोदरा, बेंगळुरू, लखनौ आणि मुंबई यांचा समावेश आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना वडोदरा येथे खेळला जात आहे. दरम्यान, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Royal Challengers Bengaluru captain @mandhana_smriti wins toss, opts to field vs Gujarat Giants
FOLLOW LIVE: https://t.co/pf1VyotVvu#GGvRCB @Giant_Cricket @RCBTweets #WPL2025 pic.twitter.com/8vFdohOb6f
— TOI Sports (@toisports) February 14, 2025
गुजरात जायंट्स: लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काश्वी गौतम.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट-हॉज, अॅलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (यष्टीरक्षक), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2025 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

