Sanjay Manjrekar यांनी छेडला नवा वाद, म्हणाले-‘सार्वकालिन महान खेळाडूंमध्ये रविचंद्रन अश्विन येत नाही’; यूजर्सने केलं जबरदस्त ट्रोल
टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध भाष्यकार संजय मांजरेकर यांनी स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. मांजरेकरांनी अश्विनला सार्वकालिन महान खेळाडू म्हणण्यात विरोध केला असूनया विधानावर त्यांनी एक ट्वीट करून नवीन वादाला सुरुवात केली आहे.
टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी 2019 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान रवींद्र जडेजाबद्दल असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे ते यूजर्सच्या निशाण्यावर आले होते आणि आता स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनबद्दल (Ravichandran Ashwin) दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. मांजरेकरांनी अश्विनला सार्वकालिन महान खेळाडू म्हणण्यात विरोध केला असूनया विधानावर त्यांनी एक ट्वीट करून नवीन वादाला सुरुवात केली आहे. मांजरेकर आपल्या वक्तव्यांमुळे सर्वांना परिचित आहेत. मांजरेकर म्हणाले, ‘‘ऑलटाइम ग्रेट’ ही एखाद्या क्रिकेटपटूला दिलेली सर्वोच्च प्रशंसा आहे. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सुनील गावसकर, तेंडुलकर, विराट इत्यादी क्रिकेटपटू माझ्या पुस्तकात महान आहेत. सन्मानपूर्वक, अश्विन अद्याप सर्वकालिन महान खेळांडूंमध्ये येत नाही.” मांजरेकरांच्या या ट्विटवर यूजर्सने अश्विनची गोलंदाजीची नोंद शेअर केली आहे आणि पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला. (Sanjay Manjrekar यांनी फ्री-हिट हटवण्याचा दिला सल्ला तर Ravichandran Ashwin ने गोलंदाजांसाठी केली विशेष मागणी)
अश्विन टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात नेण्यासाठी अश्विनने अन्य खेळाडूंसह मोलाची भूमिका बजावली आहे. शिवाय, अश्विन या स्पर्धेत भारताचा आघाडीचा गोलंदाज असून एकूणच तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने 13 सामन्यात एकूण 67 विकेट्स घेतल्या असून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून 78 कसोटी सामन्यांमध्ये 409 बळी घेतले आहेत. मात्र असे असूनही मांजरेकरांनी त्याला सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये घोषित करण्यात आक्षेप व्यक्त केला. मग काय होतं, या ट्विटवर यूजर्सने मांजरेकरांना धारेवर धरलं. काहींनी अश्विनचा रेकॉर्ड शेअर केला तर कोणी त्यांना त्यांच्या कारकीर्दीची आठवण करून दिली.
जरा स्वतःकडेही पहा!
पुन्हा विचार करा!
त्याने 8 मालिकावीर पुरस्कार जिंकले...
2019 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान मांजरेकर यांनी जडेजाला बिट्स अँड पिसेस क्रिकेटर म्हटले होते. स्वतः जडेजाने ट्विटरद्वारे मांजरेकरांना योग्य प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, अश्विनने भारत आणि भारताबाहेरही शानदार गोलंदाजी केली आहे. सध्या त्याचा जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये समावेश होतो. अश्विन सध्या इंग्लंडमध्ये असून भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध साऊथॅम्प्टन येथे 18 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा फायनल सामना खेळणार आहे. यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)