Rohit and Virat Out of T20 Series: रोहित-विराटला टी-20 मालिकेतून बाहेर ठेवल्याने गांगुली संतापला, म्हणाला- 'दोघेही सर्वोत्तम खेळाडू'
गांगुल म्हणाला की, 'विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांकडे अजूनही टी-20 क्रिकेट बाकी आहे'.
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. जिथे त्यांना कसोटी, वनडे नंतर टी-20 मालिका खेळायची आहे. यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) बाहेर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीच्या या निर्णयावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) प्रश्न उपस्थित केले आहेत. गांगुल म्हणाला की, 'विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांकडे अजूनही टी-20 क्रिकेट बाकी आहे'. (हे देखील वाचा: MS Dhoni Birthday Celebration In Nepal: नेपाळमधील चाहत्यांनी एमएस धोनीचा वाढदिवस 'या' खास पद्धतीने केला साजरा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल)
'दोघेही सर्वोत्तम खेळाडू'
सौरव गांगुलीने एका क्रीडा मंचावर संवाद साधला. ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की, 'अर्थात तुम्ही तुमचे सर्वोत्तम खेळाडू निवडले पाहिजेत, ते कोण आहेत याने काही फरक पडत नाही. माझ्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचेही टी-20 क्रिकेटमध्ये स्थान आहे. मला समजत नाही की कोहली किंवा रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय का खेळू शकत नाहीत. आयपीएल दरम्यान कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता, जर तुम्ही मला विचाराल तर दोघांना टी-20 क्रिकेटमध्ये स्थान आहे.
हार्दिक पांड्या कर्णधार
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद येथे होणार आहे. या मालिकेसाठी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल, तर आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या टिळक वर्मा यशस्वी जैस्वालला संधी मिळाली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20 - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा T20 - 6 ऑगस्ट, गयाना
तिसरा T20 - 8 ऑगस्ट, गयाना
चौथा T20 - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा T20 - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा