या 5 स्टार क्रिकेटपटूंनी निवृत्तीतून केलं आंतरराष्ट्रीय कमबॅक, यादीत भारतीय नव्हे बड्या पाकिस्तानी खेळाडूंचे राज्य

डीव्हिलियर्सने पुनरागमन करण्याची संधी नाकारली असली तरी जगात निवृत्तीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्तीतून यू-टर्न घेत पुन्हा एकदा कमबॅक करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावे खालीलप्रमाणे आहे.

शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवृत्तीनंतर पुनरागमन करण्यास नकार दिला आहे. आफ्रिकेच्या या स्टार फलंदाजाने मंगळवारी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी चर्चा केली आणि तेथे त्याने निवृत्तीचा निर्णय 'फायनल' होता आणि तो टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नसल्याची पुष्टी केली. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणाऱ्या डिव्हिलियर्सने अलीकडेच टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, त्याने आता पुनरागमनाचे दार बंद केले आहे आणि जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहण्याची घोषणा केली. दरम्यान डीव्हिलियर्सने पुनरागमन करण्याची संधी नाकारली असली तरी जगात निवृत्तीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्तीतून यू-टर्न घेत पुन्हा एकदा कमबॅक करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावे खालीलप्रमाणे आहे. (AB de Villiers निवृत्तीतून करणार आंतरराष्ट्रीय कमबॅक? CSA ने दिली बिग ब्रेकिंग)

कार्ल हूपर (Carl Hooper)

माजी विंडीज कर्णधार कार्ल हूपर आयसीसी विश्वचषक 1999 च्या तीन आठवड्यांपूर्वीच निवृत्त झाला. 2001 मध्ये सरप्राईज कमबॅक करण्यापूर्वी तो काही काळ अ‍ॅडलेडमध्ये राहत होता. त्या संक्रमणकालीन टप्प्यात हूपर हा विंडीजचा महत्त्वाचा क्रिकेटपटू होता आणि त्याने पुनरागमन जाहीर केल्याबरोबर लगेचच त्याला कर्णधारपद सोपवण्यात आले. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका विश्वचषक आयोजित करणारा पहिला आफ्रिकी देश बनला तेव्हा अष्टपैलू खेळाडू विंडीज संघाचा कर्णधार होता.तथापि, एका भयंकर मोहिमेनंतर त्याने पुन्हा निवृत्ती घेतली आणि यावेळी परत कधीच आले नाही.

केविन पीटरसन

पीटरसन आपल्या विधाडीत कारकीर्दीत नेहमीच इंग्लंड संघाचा अविभाज्य भाग होता. 2011 मध्ये पीटरसन म्हणाला की, आपला खेळ प्रदीर्घ स्वरूपात सुधारण्यासाठी तो व्हाइट बॉल क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पण काही महिन्यातच त्याने निर्णयातून यू-टर्न घेतला आणि वनडे व टी-20 संघात जवळजवळ त्वरित निवड झाली. इंग्लंड एकदिवसीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वेगवान 2 हजार धावा करण्याचा विक्रम पीटरसनच्या नावावर आहे. कारकीर्द संपुष्टात येण्यापूर्वी त्याने देशासाठी वनडे सामन्यात 4,440 धावा केल्या. त्यानंतर पीटरसन पूर्णवेळ भाष्यकार झाला आणि त्याने 2019 विश्वचषकात आपले भाष्यकार म्हणून काम केले.

शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने अनेक वेळा निवृत्तीची घोषणा केली होती पण संघात अनुभव नसल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला बोलावण्यात आले होते. आफ्रिदीने कारकिर्दीत एकूण पाच वेळा निवृत्त होऊन चार वेळा कमबॅक केले. 2006 मध्ये सुरुवात झाली जेव्हा त्याने कसोटीत तात्पुरती निवृत्तीची घोषणा केली होती पण 2010 मध्ये त्याने कर्णधार म्हणून पुनरागमन केलं. शेवटी त्याने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली परंतु तो अद्यापही जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. पाकिस्तानकडून खेळलेला सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 27 कसोटी सामने, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी -20 सामने खेळले.

इमरान खान (Imran Khan)

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि देशाचा विद्यमान पंतप्रधान इमरान खानने 1987 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झिया-उल-हक यांच्या विनंतीवरून खान यांनी पुनरागमन केले आणि 1992 मध्ये पाकिस्तानला आतापर्यंतचा एकमेव वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिले.

जावेद मियांदाद (Javed Miandad) 

1986 मध्ये भारताविरुद्ध चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूच्या षटकारासाठी प्रसिद्ध मियांदादने इमरानप्रमाणेच निवृत्तीनंतर पुनरागमन केले पण त्यांनी फक्त 10 दिवसांच्या निवृत्तीच्या कालावधीत असे केले. तत्कालीन पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी 1996 वर्ल्ड कपपर्यंत संघात खेळण्यास सांगितल्यानंतर मियांदादने पुनरागमन केले. मियांदादने या स्पर्धेच्या तीन डावात केवळ 54 धावा केल्या आणि शेवटी वयाच्या 39 व्या वर्षी कारकीर्द संपुष्टात आणली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif