एम एस धोनीची ‘अशी’ झाली होती टीम इंडियासाठी निवड, भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या विकेटकीपर आणि निवड समिती सदस्याने सांगितला अनटोल्ड किस्सा
किरमाणी यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना धोनीच्या निवड विषयी एक खास आठवण सांगितली.
माजी निवड समिती सदस्य सय्यद किरमाणी यांनी धोनीची संघात निवड कशी झाली? वर्षांपूर्वी किरामनी, भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. किरमाणी यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना धोनीच्या निवड विषयी एक खास आठवण सांगितली.
वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनल सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धोनी किंवा निवड समितीने अद्याप यावर उघडपणे कोणतेही भाष्य केले नाही. शिवाय, काही दिवसांपूर्वी #Dhoni Retires असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. मात्र धोनीची पत्नी साक्षीने त्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. या दरम्यान, माजी निवड समिती सदस्य सय्यद किरमाणी यांनी धोनीची संघात निवड कशी झाली? याबद्दलचा एक किस्सा सांगितला. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण टीम इंडियाला आज जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर देण्यासाठी भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकच जबाबदार आहे. वर्षांपूर्वी किरामनी, भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. किरमाणी यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना धोनीच्या निवड विषयी एक खास आठवण सांगितली.
किरमाणी म्हणाले, “धोनीची संघात निवड कशी झाली याबद्दल मी कधीही कोणाला सांगितलेलं नाही. पण आता मी सांगतो. पूर्व विभागातील माझा निवड समिती सहकारी प्रणव रॉयसोबत मी रणजी ट्रॉफीमधील सामना पाहत होतो. मला तो सामना कोणता होता ते आठवत नाही कारण ती गोष्ट खूप जुनी आहे. प्रणव मला म्हणाला की झारखंडकडून खेळणार यष्टीरक्षक-फलंदाज खूप चांगला युवा फलंदाज आहे. संघात निवड होण्यासाठी तो पात्र उमेदवार आहे. मी प्रणवला विचारलं की तो आता किपिंग करतोय का? त्यावर प्रणव म्हणाला की तो आता फाईन लेगवर फिल्डिंग करतोय. त्यानंतर मी धोनीची मागील दोन वर्षातील आकडेवारी मागवली आणि मी खरंच ते पाहून आनंदी झालो. त्याची किपिंग न बघताच आम्ही थेट त्याला पूर्व विभागातून निवडलं आणि त्यानंतर त्याने इतिहास घडवला.” (हेही वाचा, ‘MS Dhoni Bhai Career Bhi Khatam Kar Denge’: MS Dhoni वरील बेन स्टोक्सच्या टिप्पणीवर भडकला श्रीसंत, WC सामन्यात धोनीच्या फलंदाजीवर केला होता प्रश्न)
धोनीने 2004 मध्ये वनडे तर, 2005 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिले 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. आयसीसीच्या मुख्य तीन स्पर्धा जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीने मागील वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. धोनी आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर परतणार होता, मात्र स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेले.