Shekhar Gawli Passes Away: माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांंचा मृतदेह सापडला, ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळुन मृत्यु

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी (Former Ranji Cricketer Shekhar Gawli) यांंचा काल नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात ट्रेकिंग करत असताना 250 मीटर दरीत कोसळुन मृत्यु झाल्याचे समजत आहे

Former Ranji Cricketer Shekhar Gawli | (Photo Credits: Facebook)

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी (Former Ranji Cricketer Shekhar Gawli) यांंचा काल नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात ट्रेकिंग करत असताना 250 मीटर दरीत कोसळुन मृत्यु झाल्याचे समजत आहे. काल, 1 सप्टेंबर रोजीची ही घटना आहे जेव्हा शेखर हे दरीत कोसळल्याचे समजले होते त्यानंंतर त्यांंचा मृतदेह मात्र सापडला नव्हता, काळोख झाल्याने काल शोध मोहित थांंबवण्यात आली होती त्यानंंतर आज सकाळी ही शोध मोहिम पुन्हा सुरु झाली आणि आज त्यांंचा मृतदेह दरीत आढळुन आला आहे.शेखर गवळी हे मुळचे नाशिकचे होते सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणुन ते काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दिप्ती गवळी आणि दोन मुले असा हसरा खेळता परिवार होता, ज्या सार्‍यांंवर या दुर्घटनेनंंतर दुःखाचा डोंंगर कोसळला आहे.

प्राप्त माहितीनुसार, लॉकडाउन मधुन थोडा ब्रेक म्हणुन शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी येथे काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. याभागात असलेल्या हॉटेल मानस परिसरातील एका ठिकाणी ते गेले असता येथील एका कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह गवळी यांना टाळता आला नाही. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन ते अचानक पडले आणि थेट दरीत कोसळले.

दरम्यान, शेखर गवळी यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. तसेच आपत्कालीन यंत्रणाही बचाव मोहिमेत सहभागी झाली. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. आज सकाळी तीन तासाच्या शोध मोहिमेनंंतर त्यांंचा मृतदेह हाती लागला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement