Rahul Dravid: ‘संघ कसा चालवायचा हे राहुल द्रविडला सांगू नका’! BCCI च्या घोषणेनंतर माजी भारतीय कर्णधाराची खास विनंती

क्रिकबझशी बोलताना जडेजाने बीसीसीआयला विनंती केली आहे की द्रविडला संघ कसा चालवायचा हे सांगू नये आणि त्याला स्वतःच्या दृष्टीनं हे काम करू द्यावे.

राहुल द्रविड (Photo Credit: Facebook)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) ड्रेसिंग रूममध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पूर्णवेळ परतणार आहे. द्रविडने आतापर्यंत राष्ट्रीय संघात दोन वेळा पार्ट-टाइम काम केले आहे आणि तो पहिल्यांदाच पूर्णवेळ पदभार सांभाळणार आहे. ICC हॉल ऑफ फेमर संघासह जगभरात प्रवास करेल आणि किमान 3 ICC स्पर्धांमध्ये - T20 विश्वचषक, 50-विश्वचषक आणि सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत असेल. टीम इंडिया (Team India) व्यतिरिक्त, द्रविडने 2 आयपीएल फ्रँचायझी, भारत अ संघ आणि अंडर-19 संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. द्रविड 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या समृद्ध कोचिंग अनुभवासह राष्ट्रीय संघात पुन्हा सामील होत आहे. मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडच्या नियुक्तीला क्रिकेट जगताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Rahul Dravid याच्या प्रशिक्षक पदावर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, ‘मिस्टर डिपेंडेबल’च्या Head Coach म्हणून नियुक्तीवर पहा काय म्हणाला ‘हिटमॅन)

भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज अजय जडेजाने (Ajay Jadeja) या नियुक्तीवर आपली भूमिका मांडताना बीसीसीआयला विशेष विनंती केली आहे. क्रिकबझशी बोलताना जडेजाने बीसीसीआयला विनंती केली आहे की द्रविडला संघ कसा चालवायचा हे सांगू नये आणि त्याला स्वतःच्या दृष्टीनं हे काम करू द्यावे. “शिस्त आणि समर्पणाचा आदर्श असेल तर तो राहुल द्रविड आहे. तुम्हाला प्रशिक्षकाकडून खूप काही हवं असतं पण शिस्त आणि समर्पण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढचा T20 कर्णधार कोण बनवणार हे पाहणं रंजक ठरेल - राहुल द्रविड किंवा [निवडकर्ता]. त्याच्या वैयक्तिक स्तुतीमध्ये काही शंका नाही पण जेव्हा कोणी भारतीय प्रशिक्षक बनतो, जर तुम्ही त्याला काम करू दिले नाही किंवा त्याच्या दृष्टीचा वापर केला नाही तर हे सर्व निरर्थक आहे, कोणीही अशा प्रकारे प्रशिक्षक होऊ शकतो,” जडेजाने क्रिकबझला सांगितले.

“म्हणून जर तुम्ही राहुल द्रविड, हे सगळ्यात मोठे नाव आणले असेल, तर किमान त्याची दृष्टी घेऊन जा. ही माझी बोर्डाला विनंती आहे... जर राहुल द्रविडसारखा माणूस सामील झाला असेल तर कृपया त्याची दृष्टी, समजूतदारपणा आणि सोबत घेऊन पुढे जा. समर्पण, संघ कसा चालवायचा हे त्याला सांगू नका.” न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेपासून द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू करणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif