माजी भारतीय खेळाडूवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला, हॉकी स्टिक आणि काठ्यांनी मारहाण केल्याने गंभीर जखमी
भारतीय माजी गोलंदाजीपटू आणि डीडीसीएचे वरिष्ठ अध्यक्ष असेल्या खेळाडूवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत त्यांना हॉकी स्टिक आणि काठ्यांनी मारहाण केली आहे.
भारतीय माजी गोलंदाजीपटू आणि डीडीसीएचे वरिष्ठ अध्यक्ष असेल्या खेळाडूवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत त्यांना हॉकी स्टिक आणि काठ्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी खेळाडूला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित भंडारी (Amit Bhandari) असे या माजी खेळाडूचे नाव आहे. सोमवारी 23 वर्षाखालालील संघाच्या ट्रायल दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. तर भंडारी यांच्या कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे मित्र सुखविंदर सिंह यांनी संत परमानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेटर संघाच्या अध्यक्ष रजत शर्मा यांनी आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचे प्रेस ट्रस्टला सांगितले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून असे समोर आले आहे की राष्ट्रीय, अंडर 23 टूर्नामेंटच्या वेळी एका खेळाडूची निवड करण्यात आली नाही. तर त्याच खेळाडूने हा हल्ला घडवून आणला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(हेही वाचा-क्रिकेटर अशोक डिंडा ह्याला सामन्यादरम्यान चेंडू लागून गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचारासाठी दाखल)
तर अमित भंडारी हे मैदानावर उभारण्यात आलेल्या एका तंबूमध्ये बसून मित्रासोबत जेवण करत असताना हा हल्ला केला आहे. तसेच जेवण करताना काही अज्ञात व्यक्ती येऊन त्यांना धमाकवू लागल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्ती निघुन गेल्यानंतर अवघ्या 15 मिनीटांच्या आतमध्ये त्याच व्यक्तींनी पुन्हा येऊन भंडारी यांना हॉकी स्टिक आणि काठ्यांनी जबरदस्त मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.