Father's Day 2020: 'बाप एक नंबरी बेटा दस नंबरी'! एम एस धोनी याची झिवा, रोहित शर्माची समायरा यांच्यासह 'या' 5 क्रिकेटपटूंची मुलं सोशल मीडियावर वडिलांपेक्षाही लोकप्रिय
क्रिकेटपटू, विशेषतः भारतीय क्रिकेटर्स नेहमीच प्रकाशझोतात असतात, त्यामुळे निश्चितच त्यांच्या मुलांवरही सर्वांचे लक्ष लागून असते. ते काय करतात, कुठे जातात, कोणासोबत फिरतात यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. आज आपण 'फादर्स डे' निमित्त अशाच काही क्रिकेटपटूंच्या मुलांबद्दल पाहणार आहोत जे त्यांच्या वडिलांपेक्षा सोशल मीडियावर अधिक मागणी आहे...
आई आणि वडिलांची छाया असलेली मुलं जगात खूप भाग्यवान असतात. जसा संपूर्ण जग मातृदिन अर्थात आईचा सन्मान म्हणून मदर्स डे साजरा करतो, त्याचप्रमाणे 'फादर्स डे' (Fathers Day) वडिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. जगातील बर्याच देशांमध्ये वेगवेगळ्या तारख आणि दिवसांनी हा दिवस साजरा केला जातो, पण यामागील भावना मात्र एक असतात ते म्हणजे आपल्या वडिलांसाठी असलेले आपले प्रेम. क्रिकेटपटू आणि त्यांच्या मुलांचंही नातं सर्वसामान्यांसारखे असते. पण आंतराष्ट्रीय क्रिकेट, बोर्डांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या लीग यामुळे अनेक पुरुष खेळाडूंना आपल्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवता येत नाही. क्रिकेटपटू, विशेषतः भारतीय क्रिकेटर्स नेहमीच प्रकाशझोतात असतात, त्यामुळे निश्चितच त्यांच्या मुलांवरही सर्वांचे लक्ष लागून असते. ते काय करतात, कुठे जातात, कोणासोबत फिरतात यावर सर्वांचे लक्ष लागून असेल.
पण, आजकाल या क्रिकेटपटूंऐवजी त्यांची मुलेच सोशल मीडियावर हिट होत आहेत. मग, ते महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा (Ziva) असो किंवा शिखर धवनचा (Shikhar Dhawan) खट्याळ मुलगा झोरावर (Zoravar), सर्व आपल्या वडिलांसोबत किंवा त्यांच्या पेक्षा लोकप्रिय आहेत. त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आपण अनेकदा पहिले आहेत. आज आपण 'फादर्स डे' निमित्त अशाच काही क्रिकेटपटूंच्या मुलांबद्दल पाहणार आहोत जे त्यांच्या वडिलांपेक्षा सोशल मीडियावर अधिक मागणी आहे...
शिखर धवन-जोरावार
टीम इंडियाच्या 'गब्बर'चा मुलगा नक्कीच सोशल मीडियावर सर्वांचा चाहता आहे. झोरावर ड्रेसिंग रूमपासून आणि मैदानाबाहेर अनेक भारतीय क्रिकेटपटूंबरोबर मजा करताना दिसून येतो. रोहित शर्माही बर्याच वेळा या खट्याळ मुलाबरोबर मजा करताना दिसला. शिखर आणि त्याची पत्नी आएशा झोरावरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात जे व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.
View this post on Instagram
Both of us missing the IPL 😊 @iplt20
A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on
रोहित शर्मा-समायरा
मुंबई इंडियन्सची सुपर क्यूट समर्थक यापैकी सर्वात लहान आहे. रोहित शर्मा आणि रितिका सजदेहची गोंडस मुलगी समायरा हीने आपल्या क्यूटनेसनेऑनलाइनवर आपला वेगळा फॅनबेस तयार केला आहे. लेकीच्या जन्मापासून रोहित आणि रितिका इंस्टाग्रामवर तिच्यासोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आले आहेत, ज्यांना त्यांच्या फॉलोअर्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
एमएस धोनी-झिवा
विश्वास न बसण्यासारखं आहे पण ज्युनियर धोनी सोशल मीडियावर खरंच वडिलांपेक्षा प्रसिद्ध आहे. झिवाच्या नावावर असलेला इंस्टाग्राम अकाउंट जो तिची आई साक्षी चालविते त्यावर तब्बल 1.6 कोटी इतके फॉलोअर्स आहेत. शिवाय, झिवाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर त्वरित व्हायरल होतात.
सचिन-सारा तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टरतेवढी प्रसिद्धी आजवर कोणत्याही क्रिकेटपटूने मिळवली नाही. पण त्याची मुलगी सारा याबाबत नक्की त्याला मागे टाकेल असे दिसत आहे. लंडनमध्ये शिक्षण घेणारी सारा नियमितपणे स्पॉट होत नसल्याने सोशल मीडियावर तिने टाकलेले फोटो आणि व्हिडिओ लागेचच व्हायरल होतात.
View this post on Instagram
Thank you for always having my back. Happy Father’s Day to my doppelgänger❤️
A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on
डेविड वॉर्नर-इंडी रे आणि आयव्ही मे
मागील महिन्यापासून बाप-लेकींची ही जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लॉकडाऊनमध्ये वॉर्नर शेअर केलेले टिकटॉक व्हिडिओमुळे या सर्वांची चांगलीच चर्चा होत असते. शिवाय, आयपीएल दरम्यान दोघी मुली आपल्या आईसोबत वॉर्नरचे सामने पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि त्याचा उत्साह वाढवतात.
View this post on Instagram
These clowns 😂😂 growing up soo fast.
A post shared by David Warner (@davidwarner31) on
दरवर्षी आपण जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' म्हणून साजरा करतो. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यसाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जाणारा हा दिवस सुरूवातीला फक्त अमेरिकेत साजरा होत होता. या दिवसाचं महत्त्व पटल्यानंतर भारतातसुद्धा हा दिवस साजरा केला जाऊ लागला. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या आनंदाने भारतातसुद्धा साजरा केला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)