Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशींना सचिन तेंडूलकर यांच्याकडून चोख प्रत्युत्तर
रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे
दिल्लीत (Delhi) सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. दरम्यान, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीदेखील शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. मात्र, शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशींना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
"भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया", अशी प्रतिक्रिया सचिन तेडूलकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: नजर हटणार तर, लगेच दुर्घटना घडणार!; Stuart Broad याने दाखवली चेन्नईमधील हॉटेलची धोकादायक अवस्था
सचिन तेंडूलकर यांचे ट्विट-
तत्पूर्वी, प्रग्यान ओझा यांनी रिहानाला उत्तर म्हणून असे ट्विट केले आहे की, 'माझ्या देशाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे. तसेच शेतकरी देशासाठी किती महत्वाचे आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे. माझा विश्वास आहे की लवकरच त्याचे निराकरण होईल. परंतु, आमच्या देशांर्गत बाबींमध्ये बाहेरील व्यक्तींनी डोकवण्याची गरज नाही.