Every Indian Should Know Hindi! सुनील गावस्कर यांच्या हिंदी भाषेवरून रणजी ट्रॉफी सामन्यात झाला वाद, म्हणाले भारतात राहणाऱ्यांना हिंदी येणे गरजेचं, (Watch Video)
गुरुवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक विरुद्ध गुजरात सामन्याच्या रणजी ट्रॉफीच्या प्रसारणादरम्यान दोन भाष्यकर्त्यांनी वादाला सुरुवात केली. दोघांनी हिंदीला 'आमची मातृभाषा' असल्याच्या चर्चेला सुरुवात केली आणि आता यापेक्षा मोठी भाषा नाही असे म्हटले.
गुरुवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक (Karnataka) विरुद्ध गुजरात सामन्याच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) च्या प्रसारणादरम्यान दोन भाष्यकर्त्यांनी वादाला सुरुवात केली. दोघांनी हिंदीला 'आमची मातृभाषा' असल्याच्या चर्चेला सुरुवात केली आणि आता यापेक्षा मोठी भाषा नाही असे म्हटले. बडोद्याच्या (Baroda) दुसर्या डावातील सातव्या षटकात ही घटना घडली जेव्हा दोन भाष्यकर्त्यांपैकी एकाने असे म्हटले: “सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हिंदी भाषेत भाष्य करीत आहेत आणि त्याच भाषेत आपले मोलाचे सल्ला देत आहे हे मला आवडले. मला हे देखील आवडले की त्याने डॉट बॉलला ‘बिंदी बॉल’ म्हणून संबोधले.” रणजी ट्रॉफीच्या या हंगामातील आत काही सामने शिल्लक आहे. आणि विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे कर्नाटक आणि बडोदाचे संघात बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी लढत सुरु आहे. पण, हा सामना एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यादरम्यान हिंदी भाष्यकारांनी आग्रह केला की प्रत्येक भारतीयाला हिंदी माहित असले पाहिजे आणि देशातील प्रत्येक व्यक्तीची मातृभाषा म्हणून घोषित केले जावे.
या वक्तव्यानंतर भाष्य करणा्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. सध्या गावस्कर हिंदीमध्ये सामन्यात भाष्य करत आहेत. सामन्यादरम्यान भाष्य करताना एका भाष्यकाराने सांगितले की "प्रत्येक भारतीयाला भारतात हिंदी माहित असायला हवी, ही आपली मातृभाषा आहे. आमच्यासाठी यापेक्षा मोठी भाषा नाही. त्यावेळी दुसर्या भाष्यकाराने या मुद्द्याचे समर्थन केले की म्हणाले की आपण अशा लोकांना पाहिले की जे म्हणतात की आपण एक क्रिकेटपटू आहात आणि तरीही तो हिंदी बोलतो. त्यांच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावरुन वाद पेटला. मात्र नंतर त्याने माफी मागितली. पाहा हा व्हिडिओ:
कर्नाटक आणि बडोदा दरम्यान सुरू असलेल्या स्पर्धेपेक्षा कर्नाटकचा संघ वरचढ दिसत आहे. कर्नाटकच्या गोलंदाजांनी बडोद्याला पहिल्या डावात 85 धावांवर ऑलआऊट केले आणि त्यानंतर कर्नाटकने 233 धावा करत 148 धावांची आघाडी घेतली. बडोदा दुसऱ्या डावात सावध फलंदाजी करत आहे. ज्यानंतर हा सामना मनोरंजक होताना दिसत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)