England Women vs South Africa Women Toss Update: इंग्लंड विरोधातील सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका महिलांनी घेतला फलंदाजीचा निर्णय

इंग्लंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे.

England Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team 9th Match 2024 ICC Womens T20 World Cup:    2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 9 वा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी इंग्लंड महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ(ENG vs SA) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय हा घेतला आहे.  टी-20 विश्वचषकात (Women T20 World Cup 2024) इंग्लंड संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे.  दुसरी कडे दक्षिण आफ्रिकेने देखील विजयाने सुरुवात केली असून त्यांना देखील या स्पर्धेत दुसरा विजय प्राप्त करायचा आहे.  (हेही वाचा - ENG W vs SA W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: टी 20 विश्वचषकात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल येथे जाणून घ्या? )

पाहा पोस्ट -

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन  -

इंग्लंड महिला प्लेइंग इलेव्हन: माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लिन्से स्मिथ

दक्षिण आफ्रिका महिला प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, ॲनेके बॉश, स्युने लुउस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif