ENG W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: महिला टी 20 विश्वचषकात आज इंग्लंड आणि स्कॉटलंड आमनेसामना, थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

ENG vs SCO (Photo Credit: @T20WorldCup)

England Women National Cricket Team vs Scotland Women National Cricket Team 17th Match 2024 ICC Womens T20 World Cup Live Streaming: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वा सामना आज इंग्लंड आणि स्कॉटलंड (ENG vs SCO) महिला संघात खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात (ICC Womens T20 World Cup 2024)इंग्लंड संघ आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. ज्यामध्ये दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी इंग्लंडचा संघ स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, स्कॉटलंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना तिन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय स्कॉटिश संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत स्कॉटलंड संघाला इंग्लंडविरुद्ध पहिला विजय नोंदवायचा आहे. (हेही वाचा:)

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड महिला संघात सामना कधी खेळला जाईल?

2024च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 17 वा सामना इंग्लंड महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यात सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल.

थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल ?

2024 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. चाहते टीव्हीवर इंग्लंड महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला संघ यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड महिला संघ: माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लिनसे स्मिथ, सोफिया डंकले, लॉरेन बेल, बेस हीथ, फ्रेया केम्प

स्कॉटलंड महिला संघ: सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियनाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक-ब्राऊन, कॅथरीन फ्रेझर, रॅचेल स्लेटर, अबटा मकसूद, ऑलिव्हिया बेल, ॲबे एटकेन ड्रमंड, हॅन्नाह रेनी, मेगन मॅकॉल, क्लो एबेल