England vs Pakistan 1st Test 2024 Day 1 Scorecard: कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांनी झळकावली शतके, पाकिस्तानची धावसंख्या 1 बाद 250
कर्णधार शान मसूदने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले शत क झळकावले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 163 चेंडूत 148 धावा करून नाबाद खेळत आहे
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 1 Scorecard: पाकिस्तान संघ विरुद्ध इंग्लंड संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 56 षटकांत 1 बाद 255 धावा या केल्या आहेत. पाकिस्तान कडून शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांनी शानदार शतके ठोकली आहेत. याशिवाय सॅम अयुब 10 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. तर इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने 10 षटकांत 51 धावा देत 1 बळी घेतला. (हेही वाचा - England vs Pakistan 1st Test 2024 Day 1 Scorecard: लंच ब्रेकपर्यंत, पाकिस्तानची धावसंख्या 1 गडी बाद 122 धावा; कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांची अर्धशतके)
पाहा व्हिडिओ -
6️⃣ hit to reach 1️⃣0️⃣0️⃣ 🔥
Star batter Abdullah Shafique 🙌#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/Ss5xyM4Cq4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 7, 2024
कर्णधार शान मसूदने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले शत क झळकावले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 163 चेंडूत 148 धावा करून नाबाद खेळत आहे तर अब्दुल्ला शफीक 10 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 1७3 चेंडूत 101 धावा करून नाबाद खेळत आहे. या दोघांच्या खेळीने पाकिस्तानचा पहिला डाव मजबूत केला आहे.
पाकिस्तानला नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत पाकिस्तानने सात कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात दोनमध्ये विजय आणि पाचमध्ये पराभव झाला आहे. पाकिस्तान संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत 19.05 टक्के आणि 16 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, घरच्या मैदानावर श्रीलंकेवर कसोटी मालिका 2-1 ने जिंकून इंग्लंड संघाने त्यांचे स्थान मजबूत केले आहे. कर्णधार बेन स्टोक्सही इंग्लंड संघामध्ये परतला आहे. तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला असला तरी त्याच्या जागी ऑली पोप कर्णधारपद भूषवत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत, इंग्लंड संघाचे 16 सामन्यांत 8 विजय, 7 पराभव आणि 1 अनिर्णित 81 गुण आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2024 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

