England vs Australia 3rd T20I Head To Head Record: मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उतरणार मैदानात, वाचा आकडेवारीत कोण वरचढ?

दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्स राखून पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team 3rd T20I 2024: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना उद्या म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधला हा सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्स राखून पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी फिट सॉल्ट सांभाळत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड

आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धा बरोबरीची होती. दोन्ही संघांमध्ये एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 12 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनेही 12 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामनेही अनिर्णित राहिले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 10 टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत इंग्लंडने 5 मालिका जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 2 जिंकल्या आहेत. याशिवाय 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

हे देखील वाचा: England vs Australia 2nd T20I Highlights: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून केला पराभव, मालिकेत साधली 1-1 अशी बरोबरी; येथे पाहा सामन्याचे हायलाइट

 

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंडचा टी-20 संघ: फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर.

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनी, ॲडम झाम्पा.