ENG vs AUS 2nd T20I Key Players: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, एकहाती फिरवु शकतात सामना

यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 चा दुसरा सामना उद्या म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष 

ट्रॅव्हिस हेड : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने 256.52 च्या स्ट्राईक रेटने 23 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांची सर्वोच्च खेळी केली.

आदिल रशीद : इंग्लंडचा अनुभवी लेगस्पिनर आदिल रशीदने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिला आहे. आदिल रशीदने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25.92 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या आहेत. आजच्या रोमांचक सामन्यातही इंग्लंड संघाला आदिल रशीदकडून मोठ्या अपेक्षा असतील.

मिचेल मार्श : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आजच्या सामन्यात कहर करू शकतो. इंग्लंडविरुद्ध मिचेल मार्श चांगली फलंदाजी करतो. मिचेल मार्शने इंग्लंडविरुद्ध 7 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 33.60 च्या सरासरीने आणि 129.23 च्या स्ट्राइक रेटने 170 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा: ENG vs AUS 2nd T20I Head To Head Record: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार दुसरा टी-20 सामना, त्याआधी आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंडचा टी-20 संघ: फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनीस, ॲडम झाम्पा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif