England's ODI Squad Against India: भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; जोफ्रा आर्चर संघाबाहेर
नुकताच इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.
England Men Name Squad for ODI Series With India: भारतीय संघाविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिकेत पराभवाचे तोंड पाहावे लागणाऱ्या इंग्लंडचा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा मनसुबा असणार आहे. नुकताच इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र, इंग्लडच्या संघाने जाहीर केलेल्या संघातून तडाखेबाज गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर, जोफ्रा आर्चरसह, जो रूट (Jo Root) आणि ख्रिस वोस्क (Chris Woakes) हे देखील एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु होण्याआधीच इग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाला 1-3 ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संघ टी-20 मालिकेत विजय मिळवेल, अशी अपेक्षा असताना इंग्लंडच्या संघाला 3-2 असा पराभव पत्कारावा लागला आहे. यातच इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. तर, एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाचा मनसुबा असणार आहे. हे देखील वाचा- IND (W) Vs SA (W) 1st T20I 2021: पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाचा दारुण पराभव; 8 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिका विजयी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर सुरुवात होईल. ही मालिका तीन सामन्यांची असेल. हे तिन्ही सामने या एकाच मैदानावर खेळविण्यात येणार आहे. पहिला सामना मंगळवारी 23 मार्च, दुसरा सामना शुक्रवारी 26 मार्च व अखेरचा सामना रविवारी 28 मार्च या दिवशी खेळविण्यात येईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे तिन्ही सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत.
संघ-
इंग्लंडचा संघ-
इयॉन मॉर्गन, मोईन अली, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, जोस बलटर, लाएम लिव्हिंगस्टोन, मॅट पर्किसन, आदील राशिद. रिरे टॉपली, मार्क वूड, टॉम आणि सॅम करन. (राखीव खेळाडू- जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हीड मलान)
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.