ENG W vs WI W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या
उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
England Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team 20th Match 2024 ICC Womens T20 World Cup Live Streaming: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचा 20 वा सामना आज इंग्लंड महिला आणि वेस्ट इंडिज महिला संघात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. इंग्लंड संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये तिन्ही वेळा विजयाची नोंद झाली आहे. उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करण्यासाठी, इंग्लंड संघ वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल आणि टी-20 विश्वचषकात सलग चौथा विजय नोंदवण्यासाठी प्रयत्न करेल. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 सामने जिंकले आहेत. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला इंग्लंडविरुद्ध तिसरा विजय नोंदवायचा आहे.
इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यात कधी सामना खेळवला जाईल?
2024 आयसीसी महिला टी20 विश्वचषकाचा 20 वा सामना इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यात मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
टी-20 विश्वचषकातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. अशा परिस्थितीत चाहते टीव्हीवर इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.
दोन्ही संघांचे खेळाडू
इंग्लंड संघ: हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनियल गिब्सन, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, बेस हीथ, ॲलिस कॅप्सी, फ्रेया केम्प, लिनसे स्मिथ
वेस्ट इंडिज संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), स्टॅफनी टेलर, डिआन्ड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, कियाना जोसेफ, आलिया ॲलेने, मँडी मंगरू, अफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसेर, करिश्मा रामहारेक, झादा जेम्स, निसा क्राफ्टन, चाडियन नेशन, शमिलिया कॉनेल