ENG vs PAK 3rd T20: इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा एकमेव विजय; मोहम्मद हाफिज, हैदर अलीच्या खेळीने अंतिम टी-20 सामन्यात 5 धावांनी विजयासह मालिका 1-1 ने ड्रॉ
मॅन्चेस्टरच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 ने अनिर्णित ठरली. अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजने 52 चेंडूत 86 धावांच्या जोरावर पाकिस्तानसाठी विजय मिळवला.
मॅन्चेस्टर (Manchester) येथील अखेरच्या टी-20 सामन्यात विजयासह पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यावर (Pakistan Tour of England) एकमेव विजय मिळवला. मॅन्चेस्टरच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) यजमान इंग्लंडविरुद्ध (England) 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 ने अनिर्णित ठरली. अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) 52 चेंडूत 86 धावांच्या जोरावर पाकिस्तानसाठी विजय मिळवला. ओल्ड ट्रॅफर्ड येथे अंतिम टी-20 सामन्यात पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत 190/4 चा स्कोर उपभरला. या दरम्यान, 39 वर्षीय हाफीजने टी-20च्या आपल्या सर्वोत्तम धावसंख्येचा बरोबरी केली. 19 वर्षीय हैदर अलीबरोबर (Haider Ali) तिसऱ्या विकेटसाठी हफीझची 100 धावांची भागीदारी खेळीचे मुख्य आकर्षण ठरली. टी-20 पदार्पणाच्या सामन्यात अलीने 33 चेंडूत 54 धावा केल्या. इंग्लंडकडून प्रत्युत्तरात मोईन अलीने (Moeen Ali) 33 चेंडूत 61 धावा केल्या आणि यजमान टीम निर्धारित ओव्हरमध्ये 185/8 धावत करू शकली. (ENG vs AUS 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा टी-20 आणि वनडे संघ जाहीर, जोफ्रा आर्चर, जोस बटलर परतले, जो रूट टी-20 संघातून आऊट)
पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब राहिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये फखर जमान माघार परतला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम देखील 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हफीज आणि हैदरने डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 धाव जोडलया. डेब्यू करणाऱ्या 19 वर्षांचे हैदर 54 धाव करून परतला. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. दुसरीकडे हफीझने जोरदार फलंदाजी सुरू ठेवली आणि 52 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 190/4 ची धावसंख्या गाठली. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डनला दोन विकेट मिळाल्या.
191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने एका धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. शाहीन शाह आफ्रिदीने जॉनी बेअरस्टोला शून्यावर परतवले. यानंतर इंग्लंड थोड्या-थोड्या अंतरावर विकेट गमावत राहिले आणि 185/8 धावाच करू शकले. पाकिस्तानकडून आफ्रिदी आणि वहाब रियाज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हाफिज मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला. दुसर्या टी -20 मध्ये त्याने 69 धावा केल्या. तर पहिला टी-20 पावसामुळे अनिर्णित राहिला. यासह कसोटी मालिका 1-0 ने गमावलेल्या पाकिस्तानने इंग्लंड दौर्यावर पहिला विजय चाखला.