ENG vs NZ 1st Test: पदार्पणाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटबद्दल दिलगीरी; म्हणाला 'ते वक्तव्य लज्जास्पद आणि खजील करणारे'
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात कसोटी सामन्यात पदार्पणाच्या दिवशी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने दिलगिरी व्यक्त केली. बुधवारी होम ऑफ क्रिकेट, लॉर्ड्स येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 27 वर्षीय रॉबिन्सनला 8 वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या काही ट्विटवर सोशल मीडियावर पत्रकारांसमोर दिलगिरी व्यक्त करताना जवळपास अश्रू अनावर झाले.
ENG vs NZ 1st Test: लॉर्ड्स (Lord's) क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरू असलेल्या सामन्यात कसोटी सामन्यात पदार्पणाच्या दिवशी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) दिलगिरी व्यक्त केली. बुधवारी होम ऑफ क्रिकेट, लॉर्ड्स येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 27 वर्षीय रॉबिन्सनला 8 वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या काही ट्विटवर सोशल मीडियावर पत्रकारांसमोर दिलगिरी व्यक्त करताना जवळपास अश्रू अनावर झाले. “माझ्या कारकीर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दिवशी, मी आठ वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या वर्णद्वेषी (Racist) आणि लैंगिकतावादी (Sexism) ट्वीटची आज मला लाज वाटते आहे, जे आज सार्वजनिक झाली आहे,” भावनिक रॉबिन्सन यांनी पहिले विधान प्रसारकांना आणि नंतर मीडियाला वाचून दाखवले. (ENG vs NZ 1st Test: न्यूझीलंडच्या या नवख्या फलंदाजाने मोडला Sourav Ganguly चा 25 वर्ष जुना रेकॉर्ड, Lord's येथे डेब्यू सामन्यात केल्या इतक्या धावा)
“मला हे स्पष्ट करायचे आहे की मी वर्णद्वेषी नाही आणि मी लैंगिकतावादी नाही. मला माझ्या कृतीबद्दल मनापासून पश्चात्ताप होत आहे आणि अशी टिपण्णी करण्याबाबत मला लाज वाटते. मी अविचारी आणि बेजबाबदार होतो, आणि त्यावेळी माझी मानसिक स्थिती विचारात न घेता, माझ्या कृती अक्षम्य होत्या. त्या काळापासून मी एक व्यक्ती म्हणून परिपक्व झालो आहे आणि ट्विटवर पूर्ण दिलगिरी व्यक्त करतो,” त्याने पुढे म्हटले. इंग्लिश काउन्टी यॉर्कशायरने तरुण असताना काढून टाकल्यानंतर त्याच्या आयुष्यातील कठीण काळात त्याने हे ट्विट पोस्ट केले होते असे रॉबिन्सन म्हणाला. वंशविद्वेष आणि लैंगिकता विरुद्ध लढा देण्याच्या प्रयत्नात आपल्या संघातील सहकारी आणि देशाच्या क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न “कमी करावेत” अशी त्याची इच्छा नव्हती. रॉबिन्सनचे हे ट्विट एप्रिल 2012 ते जून 2013 दरम्यान असल्याचे सांगितले जात आहेत. त्यावेळी तो 18 वर्षांचा होता. आपल्या ट्विटमध्ये त्याने दहशतवादाशी संबंधित असलेल्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या संगतीचे वर्णन करणाऱ्या शब्दांचा प्रयोग केला आहे. इतकंच नाही तर महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांसाठीही अपमानास्पद भाष्य केले गेले.
ओली रॉबिन्सनचे जुने ट्विट
दरम्यान, इंग्लंडकडून पदार्पण करताना रॉबिनसनने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवशी 2 विकेट्स घेतल्या. 2 जून रोजी सुरु झालेल्या सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून यजमान संघाला पहिले गोलंदाजी करण्यास सांगितले. रॉबिन्सनने पहिल्या दिवशी टॉम लाथम (23) आणि माजी कर्णधार रॉस टेलर (14) यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले तर किवी संघाने पदार्पणवीर डेव्हन कॉनवेच्या नाबाद 136 धावांच्या जोरावर पहिल्या दिवसाखेर 246/3 धावांपर्यंत मजल मारली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)