ENG vs AUS 2nd T20: जोस बटलरच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात, मालिकेतही 2-0 ने विजयी आघाडी

साउथॅम्प्टन येथे झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. जोस बटलरने नाबाद 77 धावांची खेळी करत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि इंग्लंडच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

जोस बटलर, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter/ICC)

साउथॅम्प्टन येथे झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने (England) ऑस्ट्रेलियाचा (Australia) 6 विकेटने पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. जोस बटलरने (Jos Buttler) नाबाद 77 धावांची खेळी करत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि इंग्लंडच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत इंग्लंडविरुद्ध सात बाद 157 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. बटलरच्या 54 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने खेळल्या डाव आणि डेविड मलानसह (Dawid Malan) (32 चेंडूत 42 धावा, सात चौकार) 87 धावांच्या भागीदारीने इंग्लंडने 18.5 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून 158 धावा करून विजय नोंदवला. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव न करता डेविड वॉर्नर बाद झाला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच ओव्हरमध्ये तीन बाद 30 अशी होती. (ICC T20I Rankings: बाबर आझम टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी कायम, डेविड मालनची टॉप-5 मध्ये एंट्री; टीम रँकिंगमध्ये इंग्लंड दुसर्‍या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर)

कर्णधार फिंच आणि मार्कस स्टोइनिस यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. फिंच 33 चेंडूत 40 आणि स्टोइनिस 26 चेंडूत 35 धावा करून बाद झाले. यासह ऑस्ट्रेलियाने 13 ओव्हरयामध्ये 5 विकेट गमावून 89 धावा केल्या. शेवटच्या सात षटकांत ग्लेन मॅक्सवेलच्या 18 चेंडूत 26 आणि अ‍ॅस्टन आगरच्या 20 चेंडूत 23 धावांच्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या 7 ओव्हरमध्ये 68 धावा केल्या. इंग्लंडने जॉनी बेअरस्टोची 9 धावांवर विकेट गमावली जो हिटविकेटमध्ये बाद होऊन माघारी परतला. यानंतर, बटलर आणि मालनने जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळली.

या दोघांनी धावसंख्या 100 च्या पार नेली पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुढाकार घेतला. अ‍ॅश्टन अगरने मालन व टॉम बॅंटन आणि अ‍ॅडम झांपाने इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनला बाद करून सामना रोमांचक बनविला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकूनही मॅच रेफरी क्रिस ब्रॉडने इंग्लंड टीमवर पहिल्या टी-20 सामन्यात स्लो-ओव्हर रेटमुळे 20 टक्के दंड ठोठावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) निवेदनात म्हटले की, मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी टाकली ज्यानंतर मॅच रेफरी ब्रॉडने दंड आकारला.  मॉर्गनने हे मान्य केले आणि या प्रकरणात कोणतीही औपचारिक सुनावणी आवश्यक नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement