ENG vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इंग्लंडने केले जोरदार ‘कमबॅक’, इंग्लिश कर्णधार इयन मॉर्गनने ठोकले विजयाचे शतक

इंग्लंडने दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांच्या फरकाने पराभूत करून मालिकेत कमबॅक केले. पहिले फलंदाजी करून 231 धावा करत इंग्लंड गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला केवळ 207 धावांनी रोखले आणि 24 धावांनी विजय मिळवला.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे 2020 (Photo Credit: Twitter/ICC)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात इंग्लंड संघाने (England Team) शानदार विजय मिळविला. क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि सॅम कुर्रान यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्‍या वनडेत विजय मिळवला आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. वोक्स, आर्चर आणि कुर्रानने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या, तर आदिल रशीदला एक यश मिळाले. इंग्लंडने दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांच्या फरकाने पराभूत करून मालिकेत कमबॅक केले. पहिले फलंदाजी करून 231 धावा करत इंग्लंड गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला केवळ 207 धावांनी रोखले आणि 24 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा विजय कर्णधार इयन मॉर्गनसाठी (Eoin Morgan) खास ठरला. कर्णधार म्हणून हा मॉर्गनचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय विजय (Morgan's 100th International Win) होता आणि असे करणारा तो इंग्लिशचा पहिला कर्णधार ठरला. ("BLM मोहिमेचे समर्थन करायचे नसल्यास स्पष्ट सांगा, निमित्त देऊ नका," माइकल होल्डिंगने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया खेळाडूंना लगावली फटकार)

रविवार, 13 सप्टेंबर मँचेस्टर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने विजयाचे शतक झळकावले आणि इतिहासाच्या पानांत त्याचे नाव नोंदवले. मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला. विजयी शतक त्याने मर्यादित षटकांत (टी-20 आणि वनडे) स्वरूपात मिळून पूर्ण केले. मॉर्गनने टी-20 मधील 51 सामन्यांपैकी 28 विजय मिळवले आहेत, तर 119व्या वनडे सामन्यात कर्णधार म्हणून त्याने 72 वा विजय मिळवून शतक पूर्ण केले. यापूर्वी, वनडे सामन्यात एलिस्टर कुकने कर्णधार म्हणून 36, तर पॉल कॉलिंग वुडने टी-20 मध्ये कर्णधार 17 विजयी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले. मॉर्गनने दोन्ही कर्णधारांना मागे टाकले आणि अव्वल स्थान पटकावले.

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून केवळ 231 धावा करू शकला, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी मोठी कामगिरी बजावली. आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 207 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लिश गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच आणि मार्नस लाबूशेन टिकू शकले. फिंचने सर्वाधिक 73 आणि लाबूशेनने 48 धावा केल्या. शिवाय, विकेटकीपर-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने 36 धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज 11 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.