'एमएस धोनीला पुन्हा भारतासाठी खेळायचे नाही असे वाटत', माजी कर्णधाराच्या टीम इंडिया पुनरागमनावर हरभजन सिंह याने केले मोठे विधान

एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माशी एका इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान त्याने हे सांगितले. लाइव्ह चॅट दरम्यान एका फॅनने धोनीच्या पुनरागमनावर प्रश्न विचारले असताना भज्जी आणि नंतर रोहितने मत व्यक्त केले.

एमएस धोनी-हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा टीम इंडियाकडून खेळणार नाही, असे फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) याला वाटते. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माशी एका इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान त्याने हे सांगितले. लाइव्ह चॅट दरम्यान एका फॅनने धोनीच्या पुनरागमनावर प्रश्न विचारले असताना भज्जी आणि नंतर रोहितने मत व्यक्त केले. गेल्या वर्षी जुलैमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धोनी अखेरीस भारतकडून केला होता. हरभजन म्हणाला, "जेव्हा मी चेन्नई सुपरकिंग्स कॅम्पमध्ये होतो तेव्हा लोकांनी मला धोनीबद्दल विचारले. मला माहित नाही, हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला पुन्हा भारताकडून खेळायचे आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे." तो म्हणाला, "मी जितके त्याला ओळखतो, त्याला पुन्हा भारतीय संघाची निळी जर्सी घालायला आवडणार नाही. आयपीएलमध्ये खेळेल, पण भारतासाठी मला वाटते त्याने निर्णय घेतला होता की की वर्ल्ड कप (2019) ही त्याची शेवटची स्पर्धा असेल." ('माझा राग तू अजून पाहिले नाहीस', जेव्हा श्रीलंकाविरुद्ध टी-20 नंतर एमएस धोनी ने कुलदीप यादव याला लगावली फटकार, पाहा व्हिडिओ)

जेव्हा हरभजनने रोहितला लोक धोनीवर प्रश्न विचारत असल्याचे सांगितले तेव्हा रोहित म्हणाला- "जेव्हा धोनी खेळत नाही, तेव्हा कुणाच्याही हाती लागत नाही, तो भूमिगत होतो. मी तुम्हा सर्वांना स्वत: रांचीला जायला सांगेन आणि विचारा कारण तोच तुम्हाला सांगू शकतो. 38 वर्षीय धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्यांचा शेवटचा सामना वर्ल्ड  कप सेमीफायनल होता, ज्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा वर्षाच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या केंद्रीय करार यादीमध्ये बीसीसीआयने त्याचा समावेश केला नाही.

उल्लेखनीय म्हणजे, धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली आहेत (वनडे आणि टी-20 वर्ल्ड आणि चॅम्पियन्स ट्रॉफी). धोनीचे चाहते आयपीएल 2020 ची आतुरतेने वाट पाहत होते, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी ही स्पर्धा होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. शिवाय धोनी, टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कपचाही भाग असेल की नाही यावर शंका आहे.