Rajinikanth On Kavya Maran: 'आयपीएलमध्ये काव्याचे दुःख बघवत नाही', रजनीकांतने वडिलांना केली विनंती; म्हणाले....

संघात स्टार खेळाडू असूनही हैदराबादला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तरीही संघ मालक काव्या मारन (Kavya Maran) आपल्या संघाला उत्साहाने चिअर करण्यासाठी मैदानात येते.

Rajinikanth And Kavya Maran (Photo Credit - Twitter)

आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) गेली काही वर्षे दुखात गेली आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये हैदराबाद संघ शेवटच्या स्थानावर राहिला. संघात स्टार खेळाडू असूनही हैदराबादला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तरीही संघ मालक काव्या मारन (Kavya Maran) आपल्या संघाला उत्साहाने चिअर करण्यासाठी मैदानात येते. सामन्यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे भाव पाहायला मिळतात. तिचे फोटो आयपीएलमध्ये व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ती स्टेडियममध्ये निराश होऊन बसलेली दिसत असते. तिच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे ती अनेकदा मैदानात खूप निराश झालेली दिसते. सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना काव्याचे हे दुःख आवडले नाही.

संघात चांगले खेळाडू समाविष्ट करा

रजनीकांतने काव्याच्या वडिलांना संघात चांगले खेळाडू निवडावेत, असे सांगितले. त्याच्या आगामी चित्रपट जेलरच्या ऑडिओ लॉन्चच्या वेळी, त्याने सनरायझर्स हैदराबादचे मालक आणि चित्रपट निर्माता कलानिथी मारन यांना संघात चांगले खेळाडू निवडण्याची विनंती केली. रजनीकांत म्हणाले, कलानिधी मारन यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगले खेळाडू ठेवावेत. आयपीएल दरम्यान काव्याला टीव्हीवर असे पाहून वाईट वाटते. आयपीएल 2023 मध्ये, काव्या मारनच्या संघाला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. (हे देखील वाचा: IPL 2024: आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत मोठे अपडेट, आता खेळाडूंना मिळणार भरपूर पैसे; जाणून घ्या कारण)

संघात बदल करुनही पदरात निराशा

आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. संघात मोठी नावे असूनही सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब झाली. संघातही अनेक बदल केले. डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, रशीद खान, जॉनी बेअरस्टो या स्टार खेळाडूंना एकामागून एक सोडण्यात आले.



संबंधित बातम्या