BCCI च्या नोटीसवर दिनेश कार्तिक याने दिले 'हे' स्पष्टीकरण, नियमाचे उल्लंघन केल्याबाबत मागितली बिनशर्त माफी

कॅरेबियन प्रीमियर लीगदरम्यान तो ट्रिनबागोचा ड्रेसिंग रूममधून सामना पाहताना दिसला होता. त्यामुळे, बीसीसीआयकडून कार्तिकला नोटिस पाठवण्यात आली होती.

दिनेश कार्तिक (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मालकीची टीम ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या (Trinbago Knight Riders) प्रचार कार्यक्रमात भाग घेत बीसीसीआयच्या (BCCI) मध्यवर्ती कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल 'बिनशर्त माफी' दिली आहे. कार्तिक आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार आहे पण, कॅरेबियन प्रीमियर लीगदरम्यान तो ट्रिनबागोचा ड्रेसिंग रूममधून सामना पाहताना दिसला होता. त्यामुळे, बीसीसीआयकडून कार्तिकला नोटिस पाठवण्यात आली होती. भारतीय क्रिकेट बोर्डला काही फोटोज मिळाले ज्यात कार्तिक त्रिनबागोच्या ड्रेसिंगरूममध्ये बसलेला दिसत आहे. याबद्दल बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी नोटिस जारी करून त्याचा करार रद्द का करू नये असा प्रश्न विचारला आहे. (दिनेश कार्तिक याला एक चूक पडली भारी; BCCI ने पाठवले नोटीस, जाणून घ्या काय आहे कारण)

याबाबत स्पष्टीकरण देताना कार्तिक म्हणाला की, "मी कोणत्याही क्षमतेत टीकेआरमध्ये भाग घेतला नाही." यानंतर कार्तिक म्हणाला की त्याला तो सामना पाहण्यासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी आमंत्रित केले होते. माझे त्रिनिदाद येथे टीकेआरचा सामना संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या आमंत्रणानंतर गेलो होतो. ते कोलकाता नाईट रायडर्सचे देखील मुख्य प्रशिक्षक आहेत. केकेआरचा कर्णधार या नात्याने माझ्यासाठी केकेआरच्या संदर्भात त्याच्याशी चर्चा करण्यासाठी येणे उपयुक्त ठरेल, असे त्यांना वाटले."

यानंतर, सर्व वादावर कार्तिकने बीसीसीआयची बिनशर्त माफी मागितली. "तिथे जाण्यापूर्वी बीसीसीआयकडून परवानगी न मागितल्याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो." आयपीएलमध्ये कार्तिक कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. कार्तिक हा BCCI शी वार्षिक कालावधीसाठी करारबद्ध आहे. या कराराअंतर्गत मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परदेशी क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा लीगमध्ये सहभागी होणे हा नियमांचा भंग ठरतो. त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचे मालकी हक्कदेखील IPL च्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मालकाकडेच आहेत. पण CPL मधील त्या सामन्यात कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या डगआऊटमध्ये बसलेला आढळला. त्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif