MS Dhoni and Ziva Advertisement: महेंद्र सिंह धोनी आणि झिवा एकत्रित झळकणार जाहिरातीत, पहा वडील-लेकीच्या नात्यामधील गोडवा जपणारा व्हिडिओ
आपण धोनी आणि झिवा यांना क्रिकेटच्या मैदनात पाहिलेच आहे. परंतु आता हे दोघे पहिल्यांदाच एका जाहिरातीतून झळकणार आहेत.
MS Dhoni and Ziva Advertisement: भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू महेंद्र सिंह धोनी याने आपली निवृत्ती जाहीर जरी केली असली तरीही त्याच्या फॅनफॉलोअर्सची संख्या कमी झालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला धोनी याची पाच वर्षाची मुलगी झिवा हिचे सुद्धा सोशल मीडियात तुफान फॅनफॉलोअर्स आहेत. तर आपण धोनी आणि झिवा यांना क्रिकेटच्या मैदनात पाहिलेच आहे. परंतु आता हे दोघे पहिल्यांदाच एका जाहिरातीतून झळकणार आहेत.(IND vs AUS 3rd Test: एमएस धोनीची बरोबरी करण्यापासून अजिंक्य रहाणे एक पाऊल दूर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विक्रमाची संधी)
जाहिरातीत धोनी आणि झिवा हे दोघे एक केक बनवताना दिसून येत असून त्यावेळी एकमेकांसोबत अधिक वेळ घालवणार असे ही वचन देताना दिसून येत आहेत. वडील-लेकीच्या नात्यामधील हा गोडवा अत्यंत भारी असून त्यांची जाहिरात प्रत्येकाला पसंद पडत आहे.(MS Dhoni यांच्या शेतातल्या भाज्यांची परदेशात मागणी, रांची फार्महाऊस वरून दुबईच्या बाजारात निर्यात करणार भाजीपाला)
तर येथे पहा जाहिरात
झिवा सोबत काम करण्याची पहिल वेळ असून त्याचा अनुभव अत्यंत भारी होता. तसेच आम्ही दोघांनी खोडकरपणे शूटिंगसाठी घालवलेले क्षण आम्हाला आनंद देऊन गेले आहेत. ओरिओ ही आमचे आवडीचे बिस्किट आहे. मी आणि झिवाने सेटवर खुप धम्माल करण्यासह नव्या कॅम्पेनदरम्यान उत्तम वेळ तिच्या सोबत घालवण्यास मिळाल्याचे धोनी याने म्हटले आहे.
एम एस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15 ऑगस्ट 2020 रोजी आपली निवृत्ती जाहीर केली. या माजी क्रिकेटपटूने आयपीएल 2020 मध्ये चैन्नई सुपर किंग्सच्या संघात राहून मात्र आपली दमदार कामगिरी दाखवली. तर आयपीएल नंतर धोनी आपल्या परिवारासोबत दुबईत वेळ घालवताना दिसून आला होता. तसेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या विवाहसोहळ्यावेळी ते दिसले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)