DC vs RCB WPL 2024 Final Playing 11: अंतिम सामन्यात दिल्ली आणि आरसीबी यांच्यात होणार टक्कर, जाणून घ्या दोन्ही संघाची काय असु शकते प्लेइंग 11
मानधनाच्या नेतृत्वाखाली संघाने एमआयला पाच धावांनी अविस्मरणीय पराभव दिला.
DC vs RCB WPL 2024 Final: महिला प्रीमियर लीगचा दुसरा (WPL 2024) हंगाम आता शिगेला पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (RCB Beat MI) विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली संघाने एमआयला पाच धावांनी अविस्मरणीय पराभव दिला. आरसीबी आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (RCB vs MI) या आवृत्तीतील विजेतेपदाचा सामना खेळताना दिसणार आहे. (हे देखील वाचा: WPL 2024 Prize Money: महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावणारा संघ असेल श्रीमंत, बक्षिसाची रक्कम कोटींमध्ये)
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने आठ सामन्यांत सहा विजय नोंदवले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा थेट फायनलमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी आरसीबीने मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
अशी असु शकतो दोन्ही संघाची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी.