विराट कोहली आणि भारतीय संघ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, बांग्लादेशविरुद्ध दिल्लीमधील पहिल्या टी-20 मॅचसाठी पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचं नाव आहे. दहशतवाद्यांच्या यादीत विराटचे नाव असल्याने दिल्ली पोलिसांकडून भारतीय संघाच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे. 

विराट कोहली (Photo Credits: Getty)

नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनआयए) एका संदिग्ध अतिरेकीचे एक पत्र आले असून त्यात एक मोठा कट रचला गेला असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने एनआयएच्या (NIA) मुख्यालयाला धमकीदायक पत्रासह एक हिट यादी पाठविली आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची नावे आहेत. हे पत्र मिळाल्यानंतर एनआयएने इतर गुप्तचर यंत्रणांना सतर्क केले आहे. शिवाय, या हिट लिस्टमध्ये समाविष्ट राष्ट्रपती, गृहमंत्री आणि कोहली यांच्यासह अन्य व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ 3 नोव्हेंबर, म्हणजे येत्या रविवारी बांग्लादेश संघाविरुद्ध पहिला टी-20 मॅच खेळणार आहे. दहशतवाद्यांच्या यादीत विराटचे नाव असल्याने दिल्ली पोलिसांकडून भारतीय संघाच्या (Indian Team) सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे. भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) मधील पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली (Arun Jaitley) स्टेडियमवर खेळला जाईल. (पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; कटात पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त)

त्यानंतर एनआयएने हे पत्र बीसीसीआयकडे पाठविले आहे. अज्ञात पत्रात असे म्हटले आहे की, कोझिकोड, केरळमधील रहिवासी असलेल्या ऑल इंडिया लष्कर कोहली आणि प्रमुख राजकारण्यांना आपला निशाणा बनवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी पुढे सांगितले की हे पत्र फसवे असू शकते, परंतु धमकीची तीव्र धारणा लक्षात घेता कोणताही धोका न पत्करता सामन्य प्रेक्षकांच्या जागेचे आणि वैयक्तिक खेळाडूंचे सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.

दुसरीकडे, अन्य मीडिया सूत्रानुसार, अखिल भारतीय लष्कर-ए-तैयबाच्या हिट लिस्टमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांचीही समावेश आहे. पण, पहिल्यांदा एखाद्या दहशतवादी संघटनेने क्रिकेटपटूला हिट लिस्टमध्ये टाकले आहे.