रिषभ पंत, शिखर धवन चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले तेव्हा..! पाहा Delhi Capitals संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दिली माहिती (See Tweet)
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायसीने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला या डीसी स्टार्सच्या अनुरुप चित्रपट किंवा शोभेल असे चित्रपटाचे शीर्षकासाठी विचारले ज्याच्यावर श्रेयसने मजेदार चित्रपटांची नावं सुचवली.
तब्बल अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारतभर 'अनलॉक 1'ची सुरुवात झाली आहे. असे असतानाही अद्याप खेळाला सुरुवात झाली नाही. मार्च महिन्याच्या मध्यापासून क्रिकेटसह आंतरराष्ट्रीय खेळ ठप्प झाले आहे. खेळाडू आपल्या घरी कैद आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहते आणि सह खेळाडूंशी संवाद साधत आहेत. या दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रिषभ पंत (Rishabh Pant), पृथ्वी शॉ आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्यासह अन्य दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे खेळाडू चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेले पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायसीने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला या डीसी स्टार्सच्या अनुरुप चित्रपट किंवा शोभेल असे चित्रपटाचे शीर्षकासाठी विचारले ज्याच्यावर श्रेयसने मजेदार चित्रपटांची नावं सुचवली. दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंचे चित्रपटाच्या नावासह पोस्टर बनवले जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (युजवेंद्र चहलने मजेदार फोटोसह रोहित शर्माला केले ट्रोल; कलाकृतीवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग हॉलिवूडच्या 'गॉड फादर' चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे, तर रिषभ पंत 'पॉवरपंती', सलामी फलंदाज शिखर धवन 'गब्बर' आणि पृथ्वी शॉ 'गली बॉय' चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहेत. या शिवाय कर्णधार श्रेयस 'इल्यूजनिस्ट' चित्रपटाच्या पोस्टर वर आहे. तुम्हीही पाहा क्रिकेटपटूंच्या चित्रपटाचे हे पोस्टर्स:
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. 8 जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज टीममध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. दुसरीकडे, टीम इंडियाचा आगामी श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौरा रद्द करण्यात आला आहे. शिवाय, आयपील, आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतही संभ्रम कायम आहे. टी-20 रद्द झाल्यास बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो दरम्यान यंदा आईपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहे.