DC vs MI, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्राचा 51वा सामना श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स आणि किरोन पोलार्डच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

DC vs MI, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा 51वा सामना श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किरोन पोलार्डच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगेल. यापूर्वीच आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL PlayOffs) पोहोचलेल्या मुंबईकसमोर अव्वल स्थानी राहण्याची संधी असेल, तर सातत्याने सामने गमावल्यानंतर अडचणीत सापडलेली दिल्ली हा सामना जिंकून प्ले ऑफचं तिकीट पक्क करू पाहत असेल. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 3:00 वाजता होईल. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 PlayOffs: कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवाने मुंबई इंडियन्सला मिळालं प्ले ऑफचं तिकीट, हे 3 संघही आहेत दावेदार)

चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात दमदार विजय नोंदवला आणि मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालिफाय केलं. गतविजेत्या मुंबईचे 16 गुण असून त्यांचा निव्वळ रनरेटही चांगला आहे आणि पॉईंट्स टेबलवर ते पहिल्या दोनमध्ये कायम राहतील. सलग तीन पराभवानंतरही दिल्ली 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. पण, या परभवातून दिल्लीने धडा शिकला असेल आणि विजय मिळवण्याच्या निर्धारित असेल. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना एका विजयाची गरज आहे, पण त्यांच्या मार्ग खडतर आहे, अशा स्थतीत ते सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील.

पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हर्षल पटेल, कीमो पॉल, एनरिच नॉर्टजे, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिशेल मॅकक्लेनाघन, मोहसिन खान, नॅथन कोल्टर-नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now