CSK vs RR Dream 11 Prediction : तुमच्या ड्रीम 11 संघात 'या' खेळाडूंचा समावेश केल्यास मोठी रक्कम जिंकण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: PTI)

आयपीएल 2021 मधील 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज (19 एप्रिल) राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयी गती राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. एकीकडे चेन्नईच्या संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत केले आहे. तर, राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला आहे. सध्या अनेकांमध्ये ड्रीम 11 गेमचे वेड पाहायला मिळत आहे. परतु, या गेममध्ये चांगल्या खेळाडूंची निवड करता न आल्याने अनेकजण निराश होतात. यामुळे आजच्या सामन्यात कोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल? यासाठी खालील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्यात आला होता. या हंगामात चेन्नई आणि आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर आपपल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने चांगली कामगिरी बजावत विजय मिळवला आहे. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch CSK Vs RR IPL 2021 Match 12: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून

हे खेळाडू अधिक पॉईंट मिळवून देण्याची शक्यता-

यष्टीरक्षक: संजू सॅमसन, जॉस बटलर (कर्णधार)

फलंदाज: सुरेश रैना, डेव्हीड मिलर, फाफ डु प्लेसिस,

अष्टपैलू: रविंद्र जाडेजा, मोईन अली,

गोलंदाज: दिपक चहर (उप कर्णधार), जयदेव उनादकट, चेतन सकारिया, क्रिस मॉरिस

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम कुरान, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, कृष्णाप्पा गौथम, लुंगी एनगीडी, मिशेल सॅंटनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, केएम आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगथ वर्मा, जेसन बेहरेन्डॉर्फ

राजस्थान रॉयल्स संघ: जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकरिया, मुस्तफिजुर रहमान, अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाळ, लियाम लिव्हिंगस्टोन , केसी करियप्पा, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत, कार्तिक त्यागी, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, आकाश सिंह