CSK Out of IPL 2020 Playoffs: आयपीएलच्या इतिहासातच प्रथमच महेंद्र सिंह धोनी याचा संघ चेन्नई सुपर किंग्स 'प्लेऑफ'च्या शर्यतीतून बाहेर

Chennai Super Kings (Photo Credits: Twitter|@ChennaiIPL)

CSK Out of IPL 2020 Playoffs: महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचा संघ चैन्नई सुपरकिंग्सची यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात दमदार खेळी दिसून आली नाही. त्यामुळेच सीएसकेचा संघ प्लॅऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही प्रथमच अशी गोष्ट घडली असून चैन्नई सुपर किंग्सला आपले स्थान टिकवता आलेले नाही. संघाच्या अशा पद्धतीच्या खेळीमुळे चाहते नाराज झाले आहेत. मात्र त्यांनी खेळाडूंचे समर्थन करणे सोडलेले नाही.(IPL 2020 Top-5 Best Catches: आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतले भन्नाट कॅच; 13व्या हंगामात जोफ्रा आर्चर, फाफ डु प्लेसिसचा सुपर कॅच पाहातच राहाल)

चैन्नईच्या संघाने रविवारी रॉयल चॅलैंजर्स बंगळुरु च्या विरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात आठ विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात रॉयल्सने मुंबई इंडियन्सच्या संघाचा पराभव करत धोनीचा संघ प्लेऑफ मध्ये पोहण्याची आशा संपवली. आरसीबी वर विजय मिळवल्याने चैन्नईला 18 सामान्यांपैकी 8 अंक मिळाले आहेत. मात्र अखेरचे दोन सामने जिंकल्यानंतरच 12 अंक मिळू शकतात. पण प्लेऑफ मध्ये पोहचण्यासाठी पर्याप्त नाही आहेत.

Pointer Table नुसार, मुंबई, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीकडे 14 पॉइंट्स आहेत. तर कोलकाता नाइट रायडर्सकडे 12 अंक असून त्यांना अद्याप तीन सामने खेळायचे आहेत. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थानचे 10-10 अंक असून क्रमश: तीन आणि दोन सामाने शिल्लक आहेत.(IPL 2020 Playoffs, Final Schedule: BCCI कडून आयपीएल 13 चे प्ले ऑफ, महिला आयपीएल वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स)

धोनी याने रविवारी आरसीबी संघाचा विजय झाल्यानंतर म्हटले होते की, जर अगणितीय समीकरण एका बाजूला ठेवल्यास आमचा संघ प्लेऑफ मध्ये पोहचेल याची कोणतीच आशा नाही आहे. तर चैन्नईच्या संघाने 2010,2011 आणि 2018 मध्ये आयपीएलमध्ये आपला विजय प्राप्त केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif