CSK tweet on Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूनंतर Chennai Super Kings कडून ट्विट, 'अशा शेवटाबद्दल कुणी विचारही नव्हता केला'
त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. 2016 मध्ये आलेला हा चित्रपट सुशांतच्या करिअरमधील एक महत्त्वाचा चित्रपट समजला जातो. सुशांत सिंह राजपूत याचा बांद्रा येथील आपल्या घरात आज (14 जून 2020) गूढ मृत्यू झाला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा त्याच्या राहत्या घरी गूढ मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल अद्याप न आल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, बॉलिवूडसह विविध क्षेत्रांतून त्याच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त व्हायला लागली आहे. क्रीडा क्षेत्रातूनही काही प्रतिक्रिया आल्या. खास करुन Chennai Super Kings (चेन्नई ने ट्विट करुन सुशांतबाबतची भावना व्यक्त केली. अभिनेता सुशांत राजपूत याने क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारीत 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni: The Untold Story) चित्रपटात मूख्य भूमिका साकारली होती. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे खास नाते आहे. धोनी हा 2008 पासून सीएसके ची धुरा सांभाळतो आहे. त्यामुळे सुशांतबाबत सीएसकेने ट्विटरच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरु 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सुशांत एका रेल्वे स्टेशनवर बसला आहे. या फोटोवर लिहिले आहे, 'एका अशा शेवटाबद्दल कोणी विचारही केला नसेल. आपल्या आत्म्याला शांती मिळो. सुशांत सिंह राजपूत' ('A finish we never expected, Rest in Peace Sushant Singh Rajput) दरम्यान, या फोटोसोबतच आम्ही अद्यापही धक्क्यातच आहोत, असे म्हटले आहे. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Passed Away: सुशांत सिंह राजपूत याच्या खाजगी आयुष्याविषयी '10' खास गोष्टी)
टविट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाच्या शुटींग आणि एकूणच काळात सुशांत आणि धोनी यांचा सहवास दिर्घकाळ चालला. धोनीच्या स्टाईलमध्ये चालने, शॉट खेळणे या सर्व गोष्टी सुशांतने अत्यंत बारकाईने पार पाडल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले. 2016 मध्ये आलेला हा चित्रपट सुशांतच्या करिअरमधील एक महत्त्वाचा चित्रपट समजला जातो. सुशांत सिंह राजपूत याचा बांद्रा येथील आपल्या घरात आज (14 जून 2020) गूढ मृत्यू झाला.