T20 Blast: मैदानावर Joe Root ने खिलाडूवृत्ती दाखवत जिंकली चाहत्यांची मने; पाहा कौतुकास्पद व्हिडिओ
क्रिकेटच्या मैदानावर खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत जो रूटच्या नेतृत्वाखालील यॉर्कशायरने व्हायटॅलिटी ब्लास्ट टी -20 लीगमध्ये झालेल्या लढतीत खेळपट्टीच्या मध्येच पडलेल्या लंकाशायरच्या फलंदाजाला रनआऊट करण्यास मना केले
क्रिकेटच्या मैदानावर खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत जो रूटच्या नेतृत्वाखालील यॉर्कशायरने व्हायटॅलिटी ब्लास्ट टी -20 लीगमध्ये झालेल्या लढतीत खेळपट्टीच्या मध्येच पडलेल्या लंकाशायरच्या फलंदाजाला रनआऊट करण्यास मना केले. क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते आणि रूटच्या संघाने आज ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. लंकाशायर संघाला 18 चेंडूंत 15 धावांची गरज असताना ही घटना घडली. क्रिकेटच्या मैदानावर खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत जो रूटच्या नेतृत्वाखालील यॉर्कशायरने व्हायटॅलिटी ब्लास्ट टी -20 लीगमध्ये झालेल्या लढतीत खेळपट्टीच्या मध्येच पडलेल्या लंकाशायरच्या फलंदाजाला रनआऊट करण्यास मना केले.
क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते आणि रूटच्या संघाने आज ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. लंकाशायर संघातील दोन फलंदाज स्टीवन क्रॉफ्ट आणि लूक वेल्स हे फलंदाजी करत होते. 18 व्या ओव्हरमध्ये वेल्स जेव्हा 27 धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने मिड ऑफच्या दिशेने एक धाव घेण्यासाठी शॉट खेळला. धाव घेत असताना नॉन स्ट्राइकला असलेला फलंदाज, स्टीवनच्या मांसपेशी खेचल्या गेल्या ज्यामुळे तो खेळपट्टीच्या मध्येच पडला. त्याला भरपूर वेदना होत होत्या. तसेच त्याची धाव देखील पूर्ण झाली नव्हती. यॉर्कशायर संघ त्याला धावबाद करू शकत होता मात्र रूटच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या यॉर्कशायरने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला बाद केले नाही. धावांचा पाठलाग करणाऱ्या लंकाशायर संघाला 18 चेंडूंत 15 धावांची गरज असताना ही घटना घडली. चेंडू डेड बॉल घोषित केल्यानंतर खेळ थांबविला आणि फिजिओथेरपिस्टने क्रॉफ्टला प्रथमोपचार दिला. विशेष म्हणजे या नंतर क्रॉफ्टने शानदार फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात यॉर्कशायरला 4 विकेटने पराभव लागला. हे देखील वाचा- Tokyo 2020: शटलर PV Sindhu, बॉक्सर MC Mary Kom आणि इतर ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये दाखल
यॉर्कशायरच्या स्पोर्ट्सशिप कृतीचा व्हिडिओ व्हायटॅलिटी ब्लास्ट टी-20 च्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर शेअर करण्यात आला असून यूजर्सकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी रूट आणि संघाच्या या कृतीचे कौतुक केले तर काही म्हणाले की ही चूक संघाला महागात पडली. लंकाशायरने 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत वेल्स आणि क्रॉफ्टच्या खेळीच्या जोरावर एक ओव्हर शिल्लक असताना 6 गडी गमावून 131 धावा केल्या. क्रॉफ्टने 29 चेंडूत नाबाद 26 आणि वेल्सने 37 चेंडूत 30 धावा केल्या. पहिले फलंदाजी करताना रूटच्या नेतृत्वातील यॉर्कशायरने सुरुवातीच्या तीन ओव्हर दोन्ही सलामीवीरांची 11 धावांच्या आत विकेट गमावली. रूटने 37 चेंडूत 32 धावा केल्या तर गॅरी बॅलन्सच्या 31 आणि विल फ्रेनच्या नाबाद 22 धावांनी संघाला 20 षटकांत 128/7 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Bumrah T20 Wicket Record: जसप्रीत बुमराहने रचला नवा इतिहास; 300 टी-20 विकेट्सचा मोठा टप्पा गाठणार ठरला पहिला भारतीय गोलंदाज
PM Kisan Samman Nidhi Yojana: जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार; कसे तपासावे स्टेटस्
Advertisement
Advertisement
Advertisement