कपिल देव आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आले आमने-सामने; भयभीत न होता वर्ल्ड विजेत्या कॅप्टनने फटकारले

1987 शारजाह सामन्यात दाऊद इब्राहिम टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला होता. तेव्हा दिलीप वेंगसरकरशिवाय त्या व्यक्तीला ओळखू शकले नाही.

कपिल देव आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Photo Credit: Facebook)

भारताचे पहिले क्रिकेट वर्ल्ड कप विजेते माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) नुकतेच माजी पाकिस्तानी (Pakistan) वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या भारत-पाकिस्तान वनडे मालिकेच्या निमित्ताने चर्चेत बनले होते. शोएबने कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढाईत निधी उभारण्यासाठी भारत-पाक वनडे मालिका खेळण्याचा प्रस्ताव दिले होता, यावर कपिल यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. पण, हे काही पहिल्यांदा नव्हे देव यांनी यापूर्वी चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) यालाही फटकारे लगावली होती. 1987 शारजाह (Sharjah) सामन्यात दाऊद इब्राहिम टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला होता. हे 'शारजाह ड्रेसिंग रूम कांड' म्हणून ओळखले जाते. 1987 मध्ये शारजाह स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुसर्‍या दिवशी खेळला जाणार होता. सराव संपल्यानंतर भारतीय संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तेव्हा दिलीप वेंगसरकरशिवाय (Dilip Vengsarkar) कॉमेडियन मेहमूद सोबत आलेल्या व्यक्तीला ओळखू शकले नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे दाऊद इब्राहिम. (तीन फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया आहे एकमेव टीम, 'हा' चकित करणारा रेकॉर्ड जाणून क्रिकेट प्रेमीला वाटेल अभिमान)

कपिल यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत या किस्स्याबद्दल सांगितले. “मला आठवतंय की 1987 मध्ये शारजाह सामन्याच्या दिवशी एक माणूस ड्रेसिंग रूम मध्ये आला. त्याला आमच्या खेळाडूंशी बोलायचं होतं. पण खेळाडूंना सोडून इतर कोणालाही ड्रेसिंग रूममध्ये येण्याची परवानगी नसल्याने मी लगेच त्याला ड्रेसिंग रूममधून बाहेर जायला सांगितलं. त्या माणसाने माझं लगेच ऐकलं आणि काहीही न बोलता तो बाहेर निघून गेला”, असं कपिल म्हणाले. अंडरवर्ल्ड डॉनच्या भेटीबद्दल माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले की, "दाऊदने टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला, तेव्हा कपिल नव्हते ते पत्रकार परिषदेत होते. त्याने पाकिस्तानला पराभूत करून शारजाहमध्ये ऑस्ट्रेलिया-एशिया कप जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला टोयोटा कारची देण्याची ऑफर दिली."

2013 मध्ये दिलीप वेंगसरकर यांनी सर्वप्रथम हा किस्सा सार्वजनिक केला होता. हा सामना अजूनही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात राहणार आहे. सामन्यात जावेद मियांदादने पाकिस्तानला ट्रॉफी जिंकवून देण्यास चेतन शर्माच्या चेंडूवरठोकलेला षटकार चाहत्यांच्या स्मरणी आहे.