IND vs AUS 2020: ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडिया खेळू शकते 5 सामन्यांची टेस्ट मालिका, जाणून घ्या कारण

दोन्ही देशांमध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, पण ही मालिका 5 सामन्यांची असावी अशी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मुख्य कार्यकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले आहेत की डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये भारताचे आयोजन करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जाईल.

टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

2020 वर्ष अखेरीस भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाचा (Australia) दौरा करणार आहे. दोन्ही देशांमध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, पण ही मालिका 5 सामन्यांची असावी अशी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची शक्यता वाढत जात आहे, कारण कोरोना व्हायरसमुळे गमावलेल्या वेळेची भरपाई करण्याचा विचार क्रिकेट अधिकारी विचार करीत आहेत, जेणेकरून पैसेही मिळू शकतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) मुख्य कार्यकारी केविन रॉबर्ट्स (Kevin Roberts) म्हणाले आहेत की डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये भारताचे आयोजन करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जाईल. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये टी-20 तिरंगी मालिकेपासून सुरू होईल आणि डिसेंबर-जानेवारीत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसह संपेल. दरम्यान, टी-20 चे 18 ऑक्टोबरपासून आयोजन केले जाईल, परंतु सद्य परिस्थिती पाहता याबाबत अनिश्चितता कायम आहे. (कोरोना व्हायरसचा कहर, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला कर्मचार्‍यांमध्ये कपात करण्याचा निर्णय)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्टस म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलले तर आम्हाला लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे. याच्या भरपाईसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करीत आहोत." ते म्हणाले, आमच्याकडे आता वेळ आहे. भारताविरुद्ध मालिकेत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. या क्षणी आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही." प्रेक्षकांशिवाय टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही विचार केला जात आहे. ते म्हणाले, "कदाचित ही आर्थिक मदत होणार नाही परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी ती आवश्यक आहे. आयसीसी आणि संपूर्ण क्रिकेट जगासाठी प्रसारण हक्कांपासून मिळणारा महसूल महत्त्वपूर्ण आहे. टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

कोरोनामुळे खेळ जगात ठप्प झाले आहे. 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 80 टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतात ब्रेक नंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका होत आहे, मात्र ही स्पर्धा आणखी वाढविण्यात यावी अशी दोन्ही देशांच्या बोर्ड प्रशासनाची इच्छा आहे. तथापि, पाच कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्धखेळलीजाणारी अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाची सर्वात जुनी आणि मोठी स्पर्धा आहे.