COVID-19: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत पैसे जमविण्यासाठी जोस बटलर करतोय वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव
बटलरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आणि याची माहिती दिली. लिलाव होणाऱ्या इंग्लंडच्या शर्टवर विश्वचषक जिंकणार्या त्याच्या सर्व साथीदारांनी स्वाक्षर्या केल्या आहेत, असे बटलरने म्हटले.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर आपले पाय पसरले आहेत, प्रत्येकजण या देशाला साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध प्रकारे आपल्या देशास मदत करीत आहे. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत, काही रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत तर काही राज्य आणि केंद्र सरकारला पैशाची देणगी देत आहेत. या दरम्यान इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) पैसे गोळा करण्यासाठी वर्ल्ड कप (World Cup) 2019 च्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आणि याची माहिती दिली. या मोहिमेची घोषणा करण्यासाठी बटलरने सोशल मीडियावर संदेशाचा प्रसार करण्यासाठी विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, रोहित शर्मा आणि शेन वॉर्न यांना टॅग केले. लिलाव होणाऱ्या इंग्लंडच्या शर्टवर विश्वचषक जिंकणार्या त्याच्या सर्व साथीदारांनी स्वाक्षर्या केल्या आहेत, असे बटलरने म्हटले. या पोस्टने 1 एप्रिलपर्यंत 150 हून अधिक बिड्स आकर्षित केल्या आहेत आणि 65,000 हून अधिक पौंड उत्पन्न केले आहेत. (Coronavirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी डेविड वॉर्नरने केले मुंडन; स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली यांनाही केले आव्हान Video)
“रॉयल ब्रॉम्प्टन आणि हेअरफिल्ड हॉस्पिटल्स चॅरिटीसाठी निधी गोळा करण्यासाठी मी माझा वर्ल्ड कप फायनल शर्टचा लिलाव करणार आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावादरम्यान बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी जीवन बचत उपकरणं उपलब्ध करुन देण्यासाठी आपत्कालीन अपील केले, ”बटलर यांनी लिहिले. 1 एप्रिलपर्यंत या आजारामुळे कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संकटाला कारणीभूत ठरले आहे. व्हायरसची 858,000 हून अधिक लोकांना लागण झाली आहे, तर 42,000 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धाही रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात मागील वर्षी 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानात खेळविण्यात आला होता. 50 चा सामना आणि नंतर सुपर ओव्हर टाय झाल्यावर इंग्लंड सर्वाधिक चौकारांच्या आधारावर सामान्यासह पहिल्यांदा विश्वचषकचे जेतेपद जिंकले.