Coronavirus Outbreak: जनता कर्फ्यू दरम्याम तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंनी कुटुंबासमवेत कसा घालवला वेळ, (Watch Videos)

यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, माजी गोलंदाज इरफान पठाण यांचा समावेश आहे.

(Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू सध्या स्वत:ला आयसोलेट करून घरी कूटुंबासोबत वेळ घालवत आहेत. वेगाने पसरणार्‍या कोरोना व्हायरसला मर्यादित ठेवण्यासाठी रविवारी भारताने 14 तासांचा कर्फ्यू पाळला. भारतात कोविड-19 ची 350 हुन अधिक जणांना लागण झाली असून 22 मार्चपर्यंत 7 जणांना या धोकादायक व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे सर्व खेळाडूंनी स्वतःला सेल्फ-आयसोलेट केले आहे. कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहत प्रत्येक खेळाडू आपल्या परीने लोकांना जागरून करण्याचा प्रयत्नही करत आहे. काल, 22 मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवेदनानुसार संपूर्ण भारतात जनता कर्फ्यू (Janta Curfew) पाळला गेला. एकही व्यक्ती रस्त्यावर उतरली नाही आणि या जनता कर्फ्यूला भरभरून प्रतिसाद दिला. (Janata Curfew: CSK चा अनोख्या पद्धतीचा गजर; कर्णधार महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह, केदार जाधव, मुरली विजय यांचा धमाकेदार व्हिडिओ व्हायरल)

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे या कठीण आणि धकाधकीच्या काळात, जगभरातील क्रीडा व्यक्तिमत्त्वे जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापरत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पोस्ट देखील शेअर करत आहेत. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), माजी गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) यांचा समावेश आहे. रविवारी इरफानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपला भाऊ युसूफ पठाणसोबत मस्ती करताना दिसत आहे. दुसरीकडे, घराच्या बाहेर न पडत येत असल्याने रोहित त्याची मुलगी समायरा सोबत घरातच क्रिकेट खेळला. अनुष्का शर्मानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली जिथे ती आणि विराट विचित्र चेहरे बनवताना दिसत आहेत. पाहा जनता कर्फ्यूच्या काळात तुमच्या आवडत्या क्रिकेटपटुंनी कुटुंबासमवेत कसा वेळ घालवला:

रोहित शर्मा

 

View this post on Instagram

 

😍🙌

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

इरफान पठाण

 

View this post on Instagram

 

Lala hath to mila leta @yusuf_pathan #home #quarantine #brothers

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on

विराट कोहली

 

View this post on Instagram

 

Self - isolation is helping us love each other in all ways & forms 🤪

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

शिखर धवन

 

View this post on Instagram

 

Who said sitting at home can't be fun?! One must always find ways to spend good time with the family and entertain themselves 😄 I also want to nominate @rohitsharma45 @hardikpandya93 @kuldeep_18 and @yuzi_chahal23 for this #BlindPillowFight challenge and do it with your family member, friend or anyone! Instagram fam, you guys can try it too! Tag me and #BlindPillowFight on your posts and stories and I'll re-share a few! Karke dikhao bhai! 😅

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

आर श्रीधर

 

View this post on Instagram

 

Stay indoors and stay fit. Our fielding coach @coach_rsridhar giving us major fitness goals from home 💪💪

A post shared by Team India (@indiancricketteam) on

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च रोजी, पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करत, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळावा असे सांगितले होते. या काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये असेही सांगितले होते. तसेच सायंकाळी 5 वाजता डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी अशा लोकांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच मिनिटे घराच्या दरवाजात, खिडकीत उभे राहून आभार मानावेत असेही सांगण्यात आले होते. खेळाडूंनी यातही सर्वांच्या साथ सामिल होत आपापल्या घरांच्या खिडकीवर येत सर्वांसमवेत टाळ्या, घंटानाद केला.