COVID-19 Outbreak: लॉकडाउनमध्ये दिसला रिषभ पंतचा वेगळा अंदाज, अशाप्रकारे ठेवत आहे स्वत:ला व्यस्त
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत लॉकडाऊनमध्ये आपला वेळ वेगळ्या प्रकारे व्यतीत करत आहे. पंत पतंग उडवून, त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळून घरात आपला वेळ घालवत आहे. आपण त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यावर पतंग उडवताना दिसत आहे.
कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात (India) 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेटर्स घरी राहून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. क्रिकेटर्स घरात राहून आपल्या तंदुरुस्तीवर काम करत असताना दिसले तर काही क्रिकेटपटू घर कामात मदत करत आहेत. याशिवाय भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) लॉकडाऊनमध्ये आपला वेळ वेगळ्या प्रकारे व्यतीत करत आहे. पंत पतंग उडवून, त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळून घरात आपला वेळ घालवत आहे. आपण त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यावर पतंग उडवताना दिसत आहे. शिवाय त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला ज्यात तो त्याच्या कुत्र्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याला भारतीय प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते, मात्र तो काही खास करू शकला नाही ज्यानंतर टीम व्यवस्थापनावर कसून टीका करण्यात आली. (Coronavirus: Lockdown काळात अनुष्का शर्मा बनली पती विराट कोहली ची हेअर स्टायलिस्ट, 'किंग कोहली'ला दिला नवीन लूक, पाहा Video)
भारतातील लॉकडाऊन दरम्यान पंतही फिटनेसवर लक्ष देत आहे. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये पंत पुश-अप करताना दिसत आहेत. बऱ्याच वेळापासून पंतला आपल्या फलंदाजीबद्दल बरीच टीकेचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध वनडे मालिकेत पंत त्याच्या फलंदाजीसह आश्चर्यकारक कामगिरी करेल अशी अपेक्षा होता पण कोरोना व्हायरसमुळे ही मालिका स्थगित करण्यात आली. यासह आयपीएलही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार होती, पण कोरोनाचा वाढता धोका पाहता ती 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली गेली.
पाहा पंत क्वारंटाइनमध्ये कसा वेळ घालवत आहे
पंतची एक्सरसाइज
दुसरीकडे, भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 149 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, भारतात या विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 873 वर गेली आहे, तर आत्तापर्यंत कोविड-19 मुळे 19 जणांनी आपला जीव गमवाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)