Coronavirus: बांग्लादेशी क्रिकेटपटू मशरफे मुर्तजाला कोरोनाची लागण, ढाका येथील घरात केलं क्वारंटाइन

बांग्लादेश क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजा आणि अन्य दोन क्रिकेटपटू नझमुल इस्लाम व नफीस इक्बाल यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 36 वर्षीय मुर्तजा गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ असून शनिवारी त्याची कोरोना टेस्ट सकारात्मक आढळून आली.

बांग्लादेश क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजा (Photo Credit: Getty)

बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजा (Mashrafe Mortaza) आणि अन्य दोन क्रिकेटपटू नझमुल इस्लाम (Nazmul Islam) व नफीस इक्बाल (Nafees Iqbal) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 36 वर्षीय मुर्तजा गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ असून शनिवारी त्याची कोरोना टेस्ट सकारात्मक आढळून आली. सध्या तो आपल्या निवासस्थानी आयसोलेशनमध्ये आहे. केवळ वनडे सामने खेळणारा आणि वर्षाच्या सुरुवातीला कर्णधारपदाचा राजीनामा देणारा मुर्तजा या आजाराने बाधित होणार दुसरा उच्चांकी क्रिकेटपटू आहे. मागील आठवड्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली होती. “आज माझी कोविड-19 चाचणी सकारात्मक आली. प्रत्येकजण कृपया माझ्या त्वरीत पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करा," मुर्तजाने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले. मुर्तजाने बांग्लादेशकडून 36 कसोटी, 220 वनडे आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. (BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना विषाणू; कुटुंबातील चौघांना Coronavirus ची लागण)

“संसर्ग झालेल्यांची संख्या आता एक लाखांवर गेली आहे. आपण सर्वांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. चला सर्व जण घरीच राहू आणि आवश्यकतेशिवाय बाहेर जाऊ नये. मी घरी प्रोटोकॉलचे पालन करतो. घाबरून जाण्याऐवजी कोरोनाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे," मुर्तजाने पुढे पोस्टमध्ये लिहिले. बांग्लादेशच्या संसदेचा सदस्य असलेला मुर्तजा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या परोपकारी कार्यात सक्रिय होता. त्याने आपल्या गावी आणि मतदारसंघ नरैलमधील लोकांना मदत केली.

दुसरीकडे, डेली स्टार वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील सर्वाधिक नुकसान झालेल्या नारायणगंज - मूळ गावी नारायणगंजमध्ये अन्न व इतर वस्तूंचे वाटप करण्यात सहभाग असलेल्या 28 वर्षीय डावखुरा फिरकीपटू इस्लामचीही कोविड-19 चाचणी सकारात्मक आली. शिवाय, बांग्लादेशचा वनडे कर्णधार तमीम इक्बालचा मोठा भाऊ आणि माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाललाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अहवालानुसार नफिसने स्वत: ला चिट्टागॉंग येथे घरी क्वारंटाइन केले आहे आणि त्याला प्राणघातक विषाणूचा संसर्ग झाल्याचीही पुष्टी केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now