Lockdown: कर्नाटक सरकारने दारुबंदी हटवल्यावर CSK ने RCB ला केले ट्रोल; 'सामना' सुरु होण्यापूर्वीच साजरा केला पराभवाचा आनंद
सीएसकेने सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि म्हटले,"नवीनतम घोषणेसह, आम्हाला आनंद होत आहे की तो सामना सुरू होण्यापूर्वीच आम्ही गमावला, कारण सध्याच्या विश्वातील लढाई अधिक महत्त्वपूर्ण आहेत."
लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे पासून सुरु झाला. या कालावधीत लॉकडाउनच्या बर्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. त्याअंतर्गत कालपासून काही भागात दारूची दुकाने उघडली गेली. पण दुकानांसमोर मोठी गर्दी जमली. बर्याच ठिकाणी ही रांग 3-4 किलोमीटर इतकी लांब होती. याच नियमांचा फायदा घेत इंडियन प्रीमिअर लीग (IPL)) टीम चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (Royal Challengers Bangalore) टॅग करून मजेदार प्रतिक्रिया दिली. चेन्नईने आयपीएलमध्ये आजवर तीन विजेतेपद मिळवले आहे, तर दोनदा आयपीएलची फायनल फेरी गाठणाऱ्या आरसीबीला एकदाही जेतेपद जिंकता आलेले नाही. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री एच. नागेश यांनी शनिवारी (2 मे) जाहीर केले की, स्वतंत्रपणे दारूची दुकाने 4 मेपासून सुरू होतील. सरकारच्या या निर्णयावर राज्याच्या विविध भागांतून मिश्रा प्रतिक्रिया उमटल्या. (Lockdown: दारूसाठी दुकांनासमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा: दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रात तळीरामांच्या लांबच लांब रांगा; Watch Video)
या निर्णयाचा फायदा घेत सीएसकेने सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि म्हटले,"दारू विक्रीसाठी चेन्नई बंगळुरुशी स्पर्धा करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नवीनतम घोषणेसह, आम्हाला आनंद होत आहे की तो सामना सुरू होण्यापूर्वीच आम्ही गमावला, कारण सध्याच्या विश्वातील लढाई अधिक महत्त्वपूर्ण आहेत." सोमवारी कर्नाटकात मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली. बेंगळुरूमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्याने दुकाने बंद करण्यात आली. सोमवारी 45 कोटींच्या मद्य विक्रीची नोंद झाली असल्याचे राज्य सरकारने सांगितले. देशातील लॉकडाउनमुळे सर्व दुकाने 25 मार्चपासूनबंद करण्यात आली होती. पाहा सीएसकेचे ट्विट:
कोविड-19 लॉकडाउन करण्यात आल्याने सर्व क्रीडा कार्यक्रम एकतर पुढे ढकलले गेले किंवा रद्द केले गेले आहेत. आयपीएलदेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. सीएसकेने 2010, 2011 आणि 2018 असेतीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आठ आयपीएल फायनल गाठल्या आहेत, जे कोणत्याही टीमसाठी सर्वाधिक आहेत. 2019 च्या अंतिम सामन्यात सीएसकेला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.