केविन पीटरसनने विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना केले विशेष अपील, इमरान खान यांची मदत करण्याच्या आवाहनावर भडकले फॅन्स
पीटरसनच्या या व्हिडिओवर भारतीय चाहते मात्र भडकले. एक यूजर म्हणाला की पाकिस्तानला मदत करण्यात काही अर्थ नाही, कारण तो या पैशाचा उपयोग दहशतवाद पसरवण्यासाठी करतो.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर पाय पसरवले आहे. या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानमध्येही (Pakistan) अशीच परिस्थिती आहे आणि बरेच क्रिकेटपटूही तेथील लोकांना मदत करत आहेत. इतर अनेक बड्या क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंह आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यांनीही शाहिद आफ्रिदी फाउंडेशनच्या मदतीचे आवाहन केले होते. आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनही (Kevin Pietersen) पाकिस्तानच्या मदतीचे आवाहन करत आहे. इंग्लंडचे माजी फलंदाज पीटरसनने परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना आवाहन केले आणि आपल्या देशासाठी मदत करण्यास सांगितले. पीटरसनने एका व्हिडिओद्वारे या कठीण काळात परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशाच्या पंतप्रधान मदत निधीसाठी देणगी देण्याची विनंती केली आहे. (Coronavirus: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना)
पीटरसन म्हणाला की, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इमरान खान आपल्या देशाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करीत आहेत आणि सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंब्याची आवश्यकता आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना पीटरसन म्हणाले की, "मी पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, आम्हाला माहित आहे की जगभरातील लोक पाकिस्तानला मदत करत आहेत. परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींनीही अधिकाधिक मदत केली पाहिजे. पंतप्रधान मदत निधीसाठी देणगी द्या." आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या 5000 रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि 93 लोकांचा बळी गेला आहे.
पीटरसनच्या या व्हिडिओवर भारतीय चाहते मात्र भडकले. एक यूजर म्हणाला की पाकिस्तानला मदत करण्यात काही अर्थ नाही, कारण तो या पैशाचा उपयोग दहशतवाद पसरवण्यासाठी करतो.
भारतासाठीही काही प्रोमो कर
हा फंड ते हाफिज सईदला देतील
दरिद्री
दान केलेले पैसे कोठे जातात हे कोणाला माहित
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात 1.14 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.