Shashi Tharoor on BCCI: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघ निवडीवरून काँग्रेस नेते शशी थरूर संतापले, बीसीसीआयला फटकारले

शशी थरूर यांनी संजू सॅमसनचा (Sanju Samson) वनडे मालिकेत समावेश न करण्यावर आणि अभिषेक शर्माचा (Abhisekh Sharma) कोणत्याही संघात समावेश न करण्यावर आक्षेप घेतला आहे.

Shashi Tharoor (PC- PTI)

मुंबई: बीसीसीआयने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा (Team India Squad for Sri Lanka Tour) केली आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ वेगळे आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या (Team India) निवडीवरून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) संतापले आहेत. शशी थरूर यांनी संजू सॅमसनचा (Sanju Samson) वनडे मालिकेत समावेश न करण्यावर आणि अभिषेक शर्माचा (Abhisekh Sharma) कोणत्याही संघात समावेश न करण्यावर आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने केलेल्या निवडीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाच्या घोषणेनंतर शशी थरूर यांनी 'X' वर एक पोस्ट केली. (हे देखील वाचा: Team India Squad for Sri Lanka Tour 2024: गौतम गंभीर येताच भारतीय संघात मोठे बदल, नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी तर अय्यर-राहुलचे पुनरागमन)

'भारतीय संघाच्या यशाने निवडकर्त्यांना काही फरक पडत नाही'

त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ खूपच मनोरंजक आहे. पण शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनची वनडे मालिकेसाठी निवड झालेली नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला कोणत्याही संघात स्थान मिळालेले नाही. कदाचित भारतीय संघाच्या यशाने निवडकर्त्यांना काही फरक पडत नाही. तरीही माझ्या शुभेच्छा संघासोबत आहेत.

खराब कामगिरीनंतरही परागला संघात संधी

याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यात रियान परागलाही बंपर फायदा झाला. त्याची टी-20 तसेच एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे परागने झिम्बाब्वे दौऱ्यावर खराब कामगिरी केली होती. त्याने 3 सामन्यांच्या 2 डावात 2 आणि 22 धावा केल्या. मात्र अभिषेक आणि ऋतुराजला पुढे ठेवून त्याची निवड करण्यात आली आहे

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्ननोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद. सिराज.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.