Chennai Super Kings च्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वी ऐवढ्या संख्येने एकाच संघातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सौरव गांगुली (Photo Credits: Getty Images)

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या अॅडिशनपूर्वी फ्रेंचाइजी टीम चैन्नई सुपर किंग्सच्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वी ऐवढ्या संख्येने एकाच संघातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली यांनी असे म्हटले आहे की, सीएसके ठरवलेल्या कार्यक्रमानुसार खेळणार की नाही हे पहावे लागेल.(IPL Official Partner 2020-22: UAE मध्ये होणार्‍या यंंदाच्या आयपीएल सह 2022 पर्यंत Unacademy असणार ऑफिशियल पार्टनर- BCCI)

इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन युएई मध्ये करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही टूर्नामेंट आयोजिक करण्यात आली आहे. टूर्नामेंटचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणार आहे. शुक्रवारी सीएसकेच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली त्यात दीपक चहर याचे सुद्धा नाव होते. शनिवारी आणखी एक खेळाडू ऋतुराज गायकवाड याला सुद्धा कोरोनाचे संक्रमण झाले आहे.(IPL 2020: आयपीएलमधील एका संघाच्या 2 खेळांडूसह 13 जणांना कोरोनाची लागण; बीसीसीआयची माहिती)

टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना सौरव गांगुली याने असे म्हटले आहे की, मी चैन्नई सुपर किंग्सच्या सध्याच्या स्थिती बद्दल काहीच बोलू शकत नाही. पण आम्ही पाहू की ते ठरवलेल्या कार्यक्रमानुसार सुरु करतील की नाही. अशा करतो की, आयपीएल योग्य पद्धतीने पार पडावी. टूर्नामेंटचा कालावधी अधिक असल्याने सर्वकाही उत्तम पार पडावी अशीच अपेक्षा आहे.

दरम्यान, अनुभवी फलंदाज सुरेश रैना हा सुद्धा शनिवारी टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वी भारतात परतला आहे. तर काही वैयक्तिक कारणांमुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसून येणार नसल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयने शनिवारी या संपूर्ण घटनेचा क्रम पाहता युएईत पोहचलेल्या सर्व लोकांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान 1988 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आल्याने त्यामधील 13 जणांना त्याचे संक्रमण झाले आहे.



संबंधित बातम्या

AFG vs ZIM 2nd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी केला पराभव, रशीद खानने केली घातक गोलंदाजी; मालिका 1-1 अशी बरोबरीत

ZIM vs AFG 2nd T20I 2024 Preview: अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20मध्ये पुनरागमन करणार की झिम्बाब्वे मालिका जिंकणार; सामन्याचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटलसह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

Zimbabwe Beat Afghanistan, 1st T20I 2024 Scorecard: रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून केला पराभव, ब्रायन बेनेटची 49 धावांची सर्वाधिक खेळी; येथे पाहा ZIM वि AFG सामन्याचे स्कोअरकार्ड

Zimbabwe vs Afghanistan, 1st T20I 2024 Key Players: आज झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर