IPL मध्ये ‘या’ दोनच खेळाडूंच्या नेतृत्वात MS Dhoni खेळला आहे, तुम्हाला माहीत आहे का?
लीग सुरू झाल्यापासून धोनी सीएसकेचा पूर्णवेळ होता. तथापि CSK वर IPL मध्ये बंदी घातली गेली तेव्हा तो 2 खेळाडूंच्या नेतृत्वात खेळला.
MS Dhoni Steps Down: आयपीएल (IPL) 15 च्या तोंडावर विश्वचषक विजेता आणि चार वेळा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चॅम्पियन कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार म्हणून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 4 वेळा आयपीएल (IPL) विजेत्या कर्णधाराने भारताचा धडाकेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडे संघाची कमान सोपवली. जडेजा 2012 मध्ये प्रथम फ्रँचायझीमध्ये सामील झाला होता. CSK साठी जडेजाचे महत्त्व काय आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की फ्रँचायझीने त्याला आयपीएलच्या लिलावपूर्वी 16 कोटी रुपयांत रिटेन केले होते. तर धोनी हा त्यांचा दुसरा पर्याय होता आणि त्याला 12 कोटी रुपयात कायम ठेवले. आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीमध्ये धोनीचे नेतृत्व इतर कोणत्याही खेळाडूने केले नसताना, आयपीएल 2016 आणि 2017 मध्ये CSK वर बंदी असताना एमएस धोनी (MS Dhoni) 2 कर्णधाराखाली खेळला. (MS Dhoni Steps Down as CSK Captain: पहिल्या सामन्याच्या 48 तासांपूर्वी धोनीने सोडलं कर्णधारपद, पहा ‘कॅप्टन कूल’च्या अखेरच्या सामन्यातील कामगिरी)
IPL 2016 मध्ये खराब कामगिरीनंतर, रायझिंग पुणे सुपरजायंट (RPS) फ्रँचायझीने धोनीच्या जागी पुढील हंगामासाठी स्टीव्ह स्मिथला कर्णधार म्हणून नियुक्त केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार RPS मध्ये धोनीचा पूर्णवेळ कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने अंतिम सामना खेळला. मात्र स्पर्धेदरम्यान त्याला एका सामन्याला मुकावे लागले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात स्मिथच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि आयपीएलमध्ये धोनीचे नेतृत्व करणारा तो फक्त दुसरा खेळाडू ठरला. दिल्लीने हा सामना 97 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
दरम्यान, जडेजा हा सीएसकेचा दुसरा पूर्णवेळ कर्णधार असेल. यापूर्वी सुरेश रैना याने CSK चे नेतृत्व केले होते. रैना यलो आर्मीचा एक दशक पूर्णवेळ उपकर्णधार होते आणि धोनीच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. धोनी कधीही आयपीएलमध्ये CSK साठी इतर कोणत्याही कर्णधाराखाली खेळला नाही आणि जडेजाला आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यातच हा सन्मान मिळवेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की धोनीने हा निर्णय अचानक घेतलेला नाही आणि गेल्या काही दिवसांपासून ते याबाबत नियोजन करत होते.